News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcivilhospital

  • ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन अटळ- खा मुंडे !

    सावरगाव घाट – पंकजा मुंडे अडचणीत असताना तुम्ही कोट्यवधी रुपयांची मदत केली,ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन निश्चित होईल अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे प्रास्ताविक केले. मुंडे साहेब भगवान गडावरून दर्शन घेऊन घरी यायचे तेव्हा साहेब आम्हाला सोन्याची वस्तू भेट द्यायचे आज साहेब नाहीत पण सोन्यासारखी माणसं सोबत आहेत.आम्ही…

  • ऊसतोड मजुरांचा कोयता बंद !

    बीड- ऊसतोड मजूर,मुकादम,वाहतूकदार यांच्या मजुरी आणि कमिशन मध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी कोयता बंद चा ईशारा संघटनेने दिला आहे.याबाबत आयोजित पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने दुसरी बैठक होणार आहे अशी माहिती प्रा सुशीला मोराळे यांनी दिली. 2023/2024 हे वर्ष ऊसतोडणी मजूर वाहतूकदार कामगार व मुकादम याचे मजुरीत वाढ कमिशन मध्ये वाढ करण्याचे वर्ष आहे 27/10/2020 मध्ये…

  • देवी शपथ सांगतो आरक्षण देणारच – मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द !

    ठाणे- आरक्षण प्रश्नावर 25 पासून आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील देवीच्या मंदिरात दर्शनांनातर पत्रकारांशी संवाद साधला. देवीची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ,सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात मराठवाड्यात कॅम्प घेण्यात येणार आहेत. मी मराठा समाजाचा आहे….

  • बुधवार पासून पुन्हा उपोषण- जरांगे पाटील यांचा ईशारा !

    अंतरवली सराटी- आरक्षणाच्या बाबत सरकारला दिलेला 40 दिवसांचा अवधी संपत आला आहे.24 ऑक्टोबर नंतर 25 पासून आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहोत अस सांगत या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.उपोषण दरम्यान सरकारच्या किंवा विरोधी कोणत्याही पुढाऱ्याला गावात प्रवेश बंदी असेल असंही पाटील यांनी…

  • परळीत मर्डर ! कायदा सुव्यवस्था धाब्यावर !!

    परळी- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी शहरात दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत.चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणीची घटना ताजी असतानाच पहाटे महादेव मुंडे या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे. परळी तालुक्यातील भोपळा या गावचे रहिवासी असलेले महादेव मुंडे यांचा…

  • जल जीवनचे पैसे आले अन लाड,धाबेकर टक्केवारीच्या मागे लागले !

    बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन योजनेचा बट्याबोळ बीड जिल्ह्यात अधिकारी आणि गुत्तेदारांनी केला आहे.या योजने साठीचे जवळपास शंभर कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत.त्यानंतर आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना बोलावून घेत रात्री उशिरापर्यंत बसून प्रभारी कार्यकारी अभियंता एम आर लाड आणि गेवराई चे उपअभियंता धाबेकर यांनी टक्केवारी जास्त देणाऱ्यांची बिले काढण्यास सुरुवात केली…

  • धन्वे प्रकरणात तत्कालीन सहायक समाजकल्याण अधिकाऱ्यांवर फौजदारी !

    बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला ओळखत असल्याचे साक्षांकन करणाऱ्या तत्कालीन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ सचिन मडावी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदमध्ये 2019 साली आदित्य अनुप धनवे याला अनुकंपावर नोकरी लागली.मात्र त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा असल्याची आणि जेलमध्ये…

  • परळीत सिनेतारका अवतरणार !

    परळी – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ‘नाथ प्रतिष्ठाण’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून तसेच ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विद्यानगर भागात नाथ प्रतिष्ठाण आयोजित भव्य दांडिया महोत्सव महिलांसाठी सुरू असून शुक्रवारपासून या कार्यक्रमात आणखीनच रंगत येणार आहे! शुक्रवारपासून या कार्यक्रमात सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार असून…

  • दहा वर्षांपूर्वी रद्द झालेल्या 13 कोटींच्या कामाची बिले उचलण्याचा जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांचा डाव !

    बीड- तब्बल दहा वर्षांपूर्वी बीड जिल्हा परिषदेच्या सीईओ नि रद्द केलेली 12 कोटी सत्तर लाख रुपयांची कामे पुन्हा पुनरुज्जीवित करून त्याची बिले उचलण्याचा डाव आखण्यात आला आहे.विशेष बाब म्हणजे ही कामे पुनरुज्जीवित केल्याचे जे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे तेच बोगस आहे.(याबाबत न्यूज अँड व्युजने मंत्रालयीन पातळीवर खात्री केली आहे )तरीदेखील या…

  • 2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !

    बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…