News & View

ताज्या घडामोडी

जल जीवनचे पैसे आले अन लाड,धाबेकर टक्केवारीच्या मागे लागले !

बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन योजनेचा बट्याबोळ बीड जिल्ह्यात अधिकारी आणि गुत्तेदारांनी केला आहे.या योजने साठीचे जवळपास शंभर कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत.त्यानंतर आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना बोलावून घेत रात्री उशिरापर्यंत बसून प्रभारी कार्यकारी अभियंता एम आर लाड आणि गेवराई चे उपअभियंता धाबेकर यांनी टक्केवारी जास्त देणाऱ्यांची बिले काढण्यास सुरुवात केली आहे.

बीड जिल्ह्यात जल जीवन योजनेचे वाटोळे तत्कालीन सीईओ अजित पवार, नामदेव उबाळे,एम आर लाड,धाबेकर,आनेराव, शिवाजी चव्हाण यांनी केले.शशिकांत कोटुळे असो की संतोष पडुळे अथवा जालिंदर डावकर या सह निखिल चव्हाण व इतर लोकांना शेकडो कामे बेकायदेशीर पध्दतीने देऊन आपले खिसे भरले.

महाराष्ट्रात सर्वात जास्त बोगस आणि नियमबाह्य कामे बीड जिल्ह्यात झाल्याचे समोर आल्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या समितीने चौकशी केली. मात्र लक्ष्मीदर्शनाला चटावलेल्या पवार अँड कंपनीने गुत्तेदारांना कारवाई करण्याऐवजी त्यांचेच लाड पुरवले.

नूतन सीईओ अविनाश पाठक हे रुजू झाल्यानंतर गुत्तेदारांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.मात्र काम झाले असेल,नियमात असेल तर बिल दिले जाईल ही भूमिका पाठक यांनी घेतली.त्यानंतर कार्यकारी अभियंता एम आर लाड आणि धाबेकर या दोघांनी गुत्तेदारांकडून तीन ते पाच टक्के वसुली सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *