News & View

ताज्या घडामोडी

Category: आर्थिक

  • का लावले माहीत नाही पण बँकेवरील निर्बंध हटवले- आदित्य सारडा !

    बीड- गेल्या 65 वर्षांपासून आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या द्वारकादास मंत्री बँकेवर आरबीआय ने निर्बंध का लावले माहीत नाही,पूर्वीच्या संचालक मंडळावर 229 कोटींच्या अपहाराचा गुन्हा का दाखल केला माहीत नाही,प्रशासकाची नियुक्ती का झाली माहीत नाही,बँकेवर राजकारणातून कारवाई झाली का,बँक राजकारणाची बळी ठरली का?माहीत नाही मात्र आरबीआय ने आता बँकेवरील निर्बंध उठवले आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य…

  • आदर्श महिला नागरी बँकेचे लायसन रद्द !

    नवी दिल्ली- छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे लायसन आरबीआय ने रद्द केले आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळणार आहेत.या बँकेत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता. जास्त व्याजाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात…

  • राजस्थानी मल्टिस्टेट बंद ! ठेवीदारांची गर्दी !!

    बीड- कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि मार्केटमध्ये एक वेगळी ओळख असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट च्या शाखा गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक बंद झाल्याने ठेवीदारांनी शाखा समोर एकच गर्दी केली आहे मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणे यांच्या समर्थनार्थ एकीकडे परळीत त्यांचे फॉलोवर्स रस्त्यावर उतरून त्यांना सपोर्ट करत असताना दुसरीकडे शाखा बंद झाल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत बीड जिल्ह्यात…

  • मल्टिस्टेट च्या कुटाण्यांमुळे प्लॉटिंग ला अच्छे दिन !

    बीड- लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था चालकांनी केला यामुळे हजारो कोटी रुपये ठेविधानांचे बुडाले मात्र आता ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सुरू आहेत त्यांच्यासमोरही ठेवी काढण्यासाठी…

  • पतसंस्थेच्या पैशातून उभारलेला गूळ कारखाना अडचणीत ! शेतकरी हवालदिल !

    बीड- मुनीम,पिग्मी एजंट ते पतसंस्थेचा अन गूळ कारखान्याचा मालक हा साईनाथ परभने यांचा प्रवास थक्क करणारा आहे.ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशातून त्यांनी हिरापूर आणि गुळज या ठिकाणी गूळ कारखाने काढले मात्र त्या धंद्यात तोटा आल्याने पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या झोपेत धोंडा घालण्याचे काम त्यांचाकडुन झाले आहे.जो माणूस ठेवीदारांचे पैसे वेळेत देऊ शकत नाही तो आपल्या उसाचे…

  • लोकांच्या ठेवी कधी अन किती द्यायच्या याचा अधिकार पतसंस्था चालकांना कोणी दिला !

    बीड- सर्वसामान्य ठेवीदारांनी मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा जर एखाद्या मल्टिस्टेट किंवा पतसंस्थेत ठेवला तर तो कधी काढायचा अन कधी नाही याचा सर्वस्वी अधिकार त्याचा आहे.त्याला गरज लागेल तेव्हा तो हवे तेव्हढे पैसे काढू शकतो,त्याला सर्व्हिस देणं हे त्या संस्थेचे कर्तव्य आहे.मात्र गेवराईच्या काही पतसंस्था मालकांनी यापुढे एका ठेवीदाराला दररोज प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय…

  • ठेवीदार अन गडाच्या पैशातून उभारले कारखाने ! मल्टिस्टेट च्या व्यवहारावर संशय !!

    बीड- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था अचानक बंद होऊ लागल्या आहेत,त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदार मात्र भिकेला लागत आहेत.जिजाऊ माँ साहेब, ज्ञानराधा नंतर मंगळवारी साईराम अर्बन बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बीड तालुक्यातील आणखी एक मल्टिस्टेट बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मल्टिस्टेट मध्ये बीड जिल्ह्यातील काही गडाचे कोट्यवधी रुपये आहेत,हे पैसे या…

  • पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    बीड- आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल सतरा वर्षांपासून ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ज्ञानराधा मल्टिस्टेट मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.या पाठीमागे मुख्य प्रवर्तक सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही हे ही तितकेच…

  • पे युनिट आणि माध्यमिक विभागात शिक्षक आणि कर्मचारी बनले एजंट ! एका एका फाईल्सठी लाखोंचा व्यवहार !

    बीड- प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांना वेतन फरक बिल काढण्यापासून ते वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यापर्यंत जे काही काम करायचे असेल, त्या कामासाठी माध्यमिकच्या वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाकडे एजंट नियुक्त करण्यात आले असून, कुठलेही काम करताना एजंटला टक्केवारीची ठराविक रक्कम दिल्याशिवाय काम होत नाही.विशेष म्हणजे विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यालयातील कर्मचारी आणि काही खाजगी लोक अशा…

  • पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

     नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…