Category: महाराष्ट्र
-

मुक्तीसंग्राम दिनी रेल्वेला पुण्यापर्यंत गती, डिसेंबर पर्यंत मुंबईशी कनेक्तीव्हीटी!
मुंबई- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड…
-

करपरा नदीतील भिंत बांधकामावर महसूलची कारवाई!
बीड –बीड शहरातील सुमती नगर भागातुन वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये मधोमध भुमाफियानी भिंत बांधून नदीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. याबाबत न्यूज अँड व्यूज ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. सदरील बेकायदेशीर भिंत बांधकाम बंद करून महसूल विभागाने भुमाफियाना दणका दिला आहे. बीड शहरातील नदी, नाले,…
-

करपरा पाठोपाठ बिंदूसरा नदीत भिंत उभारून नदी गिळंकृत करण्याचा डाव!
बीड –बीड शहरातील भुमाफियानी नदी, नाले, ओढे, ओपन स्पेस ढापण्याचे काम सुरु केले आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या नदी पुनःरुज्जीवन आणि संवर्धन यासाठी प्रयत्न करत असताना बीडमध्ये मात्र भुमाफिया नदीत भिंती उभारू लागले आहेत. करपरा नदीत भिंत उभराल्यानंतर आता बिंदूसरा नदीतदेखील भिंत बांधून भुमाफियानी नदीवर अतिक्रमण केले आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे…
-

भाशिप्र पाठोपाठ चंपावती शिक्षण संस्थेच्या चौकशीचे आदेश!
बीड –बोगस शालार्थ आयडी, नोकर भरती आणि इतर गैरप्रकार बाबत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या चौकशी पाठोपाठ बीडमधील नावाजलेल्या चंपावती शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत. किरण देशपांडे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती,…
-

भाशिप्र मधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती!
बीड -भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड व इतर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व कर्मचारी भरती बाबत प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण देशपांडे यांच्या तक्रारी वरून शिक्षण उपसंचालक यांनी ही समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे आता या संस्थेत बोगस…
-

भुमाफियानी करपरा नदी केली गिळंकृत!
बीड – बीडच्या भूमाफियांनी अक्षरशः नदीपात्र गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष बाब म्हणजे नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेत नदीवर करण्यात आलेले अतिक्रमण अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील सुमती नगर भागात करपरा नदीच्या मधोमध भिंत घालून भूमाफियांनी नदी गिळंकृत करत प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे राज्याच्या पर्यावरण…
-

आवक जावक खाडाखोड प्रकरणी चौकशी समिती गठीत!
बीड –बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात आवक जावक रजिस्टर मध्ये झालेल्या खाडाखोड प्रकरणात शिक्षण उपसंचालक यांनी त्रिस्तरीय समितीचे गठण केले आहे. हिंगोलीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण…
-

मुख्याध्यापक, शिक्षकाने उचलले इन्कम टॅक्स चे लाखो रुपये!
बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थेचा आणखी एक कारभार उजेडात आला आहे. या संस्थेच्या बीड मधील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स चे तब्बल पंधरा लाख रुपये उचलून घेतले. मात्र संस्थेने ही बाब उजेडात आल्यानंतर बदली आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्या पलीकडे कोणतीच…
-

महिलेच्या पोटात ग्लोज अन टीश्यू पेपर!जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार!
बीड –बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शल्य चिकित्सक डॉ सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे समोर आले आहे. सिझेरियन केलेल्या एका महिलेच्या पोटात ग्लोव्हज आणि टीश्यू पेपर राहिल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे. आरोग्य खात्याचे कारनामे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोर्या रूग्णांच्या मुळावर उठला आहे. बाळांतपणासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या एका…
-

परभणीचे सीएस आणि डीएचओ सस्पेंड!
परभणी -गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणी परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मोरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजय पांचाळ या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य सेवेतील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.परभणीच्या जिंतूर येथील शेख अमीना शेख आयुब या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला परभणी स्त्री जिल्हा रुग्णालयात…


