बीड -गेल्या काही दिवसापूर्वी बीडमध्ये उघडकीस आलेल्या एका अत्याचार प्रकरणात आरोपीकडून थोडे थोडके नव्हे तर अकरा लाख रुपये आपल्या पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर घेणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरु झाली आहे. या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकारी मॅनेजमेंट साठी धडपड करत असल्याची चर्चा आहे.
बीड शहरांत काही दिवसापूर्वी एका तरुणीवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला मात्र आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच तपास संथ गतीने करण्यासाठी म्हणून संबंधित ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्याने तब्बल अकरा लाख रुपये उकळत तोडीपाणी केली.
विशेष बाब म्हणजे हे पैसे आपल्या पत्नीच्या आणि नातेवाईकांच्या नावावर घेतले गेले. याबाबत थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे सबल पुराव्यासहित पुरावे सादर केले गेले. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठानी तातडीने संबंधित ठाणे प्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
तसेच या अधिकाऱ्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. या विभागाकडून देखील चौकशी सुरु आहे. हा ठाणे प्रमुख यापूर्वी देखील दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असताना आपल्याच ठाण्यातील करणाचाऱ्याच्या पत्नी सोबतच्या मधुर संबंधामुळे चर्चेत आला होता. त्या प्रकारणाच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.
अशातच आता हे प्रकरण उघडकीस आल्याने या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Leave a Reply