सावरगाव घाट – पंकजा मुंडे अडचणीत असताना तुम्ही कोट्यवधी रुपयांची मदत केली,ताईंची शक्ती अन तुमची ताकद एकत्र आल्यास परिवर्तन निश्चित होईल अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे प्रास्ताविक केले.
मुंडे साहेब भगवान गडावरून दर्शन घेऊन घरी यायचे तेव्हा साहेब आम्हाला सोन्याची वस्तू भेट द्यायचे आज साहेब नाहीत पण सोन्यासारखी माणसं सोबत आहेत.आम्ही लाखोंचा जनसागर कमावला आहे.हा शांत समुद्र नाही हा सागर स्फुल्लिंगाचा आहे,येथील प्रत्येक माणूस संघर्षाचा प्रतीक आहे.मुंडेंनंतर तुम्ही आम्हाला साथ दिली.निष्ठा दाखवली.दबावासमोर न झुकता तुम्ही साथ दिली.
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
- आजचे राशीभविष्य!
- खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
- आजचे राशीभविष्य!
- कीर्तिरूपी उरावे………!
स्वाभिमानाचे स्फुलिंग आहात तुम्ही,ताईंनी न मागता तुम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी जमा केला.ताई ज्योतिप्रमाणे भासत आहेत.पावित्र्य, निष्ठा ,निस्वार्थी भावना आहे.ताईंच्या पराक्रमाची ज्योत आणि तुमची ताकद सोबत आली तर परिवर्तन नक्की होईल अस मत खा प्रीतम मुंडे यांनी मांडले.





Leave a Reply