News & View

ताज्या घडामोडी

पवारांची आष्टी येथील सभा रद्द !

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी आष्टी येथे आयोजित करण्यात आलेली प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. पवार यांची तब्येत बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बीड लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

बजरंग सोनवणे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..

तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त प्रकृतीला जपा! साहेब, तब्येतीला जपा. फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

~ तुमचा,
बजरंग बप्पा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *