News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcivilhospital

  • जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहा तास मॅरेथॉन बैठक !

    बीड – जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनसह विविध मॅरेथॉन बैठकांचे जवळपास सलग 6 तासांचे सत्र पार पडले.याद्वारे पर्यटन, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास,खनिज,शिक्षण आणि गृह विभागाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या 6 तासांच्या बैठकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेऊन, उद्दिष्ट…

  • ट्रक बस अपघातात बारा ठार !

    वैजापूर-समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात…

  • भारताने पाकड्याना धूळ चारली !

    अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्‍या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्‍यासह अष्‍टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक…

  • भुजबळ, सदावर्ते,फडणवीसांना जरांगे पाटलांचा इशारा !

    अंतरवली सराटी- मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ, ऍड गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी या ठिकाणी आयोजित लाखोंच्या सभेत जरांगे पाटील कडाडले.22 ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. आज अंतरवाली सराटीत मराठा…

  • शेकडोंच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अफवा अन ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी !

    बीड- केवळ भारतातच नाही तर विदेशातही तिरुमला हा ब्रँड आणि बीड च नाव पोहचवणाऱ्या द कुटे ग्रुपच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने तपासणी सुरू केली अन बीडमध्ये कुटे अडचणीत आल्याची अफवा पसरली.त्याचा फटका सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेला बसला आहे.पतसंस्थेमधून ठेवी काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.एका अफवेमुळे हजारोंच्या काळजाचा ठोका चुकला असून त्यामुळे ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी…

  • तब्बल 21 दिवस दिवाळीच्या सुट्या !

    बीड- जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि खाजगी शाळांना दिवाळीच्या सुट्या 6 नोव्हेंबर पासून असतील.तब्बल 21 दिवस ही सुट्टी असणार आहे.28 नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू होतील असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच शाळांना वर्षभरात एकूण 76 सुट्या दिल्या जातात.त्यामध्ये उन्हाळी सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांचा विशेष समावेश असतो.बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत…

  • लेक लखपती होणार !

    मुंबई- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८…

  • आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!

    बीड- बलात्काराचा दाखल असलेला गुन्हा दडवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळणाऱ्या आदित्य अनुप धन्वे यास दहा वर्षाची शिक्षा ठोठावल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.मात्र त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, रुजू करून घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ओळख दाखवून साक्षांकन देणारे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित…

  • मध्यप्रदेश सह पाच राज्यात निवडणुकांचा बिगुल !

    नवी दिल्ली- केंद्रिय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.पुढील महिन्यात 7 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या पाच राज्यात मतदान होऊन मतमोजणी केली जाईल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल….

  • जवान तावरेंच्या पार्थिवावर सोमवारी गावाकडे अंत्यसंस्कार !

    बीड -उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला या पुरात वाहून गेल्याने बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव पुणे येथे पोहचले आहे. उद्या सोमवारी मुळगाव असलेल्या काकडहिरा येथे सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा…