News & View

ताज्या घडामोडी

ट्रक बस अपघातात बारा ठार !

वैजापूर-समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही महिला देखील या अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *