News & View

ताज्या घडामोडी

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहा तास मॅरेथॉन बैठक !

बीड – जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनसह विविध मॅरेथॉन बैठकांचे जवळपास सलग 6 तासांचे सत्र पार पडले.याद्वारे पर्यटन, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास,खनिज,शिक्षण आणि गृह विभागाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या 6 तासांच्या बैठकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेऊन, उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने सर्व यंत्रणांना निर्देश दिले.

पर्यटन, पुरातत्व विभागाचे प्रस्ताव, बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड, नारायणगड आदी गडाच्या विकासाचे सादरीकरण पाहताना धनंजय मुंडे यांनीही यावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले.

बैठकीस धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्याच्या खासदार, बीडचा एक अपवाद वगळता सर्व आमदार, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी बीड गाठले, आता सत्कार नको तर काम करू द्या, अशी भूमिका मांडली. आज बैठकीसह सामान्य लोकांनाही वेळ देता यावा, यासाठी धनंजय मुंडे यांनी रविवारी रात्रीच बीड गाठले होते.

आजही सकाळी 10 वाजल्यापासून सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारणे, त्यांचे प्रश्न/मागण्या मार्गी लावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या नियोजित कार्यालयाची पाहणी, आदी कामे त्यांनी केली.

कृषी अभियांत्रिकीकरण योजनेतून वितरित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर्सच्या वितरण समयी, धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबतची आपली तळमळ व प्रयत्न याबाबत आत्मीयता व्यक्त केली. मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांनी बोलताना ‘जिल्ह्याची तसविर आणि तकदिर बदलायची आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यादृष्टीने धनंजय मुंडे हे प्रत्येक पाऊल टाकताना दिसत आहेत.

जिल्हा नियोजन नंतर एकापाठोपाठ एक सलग चार विषयांच्या बैठका झाल्या, या सर्व बैठकांना खा.रजनीताई पाटील व खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यादेखील शेवटपर्यंत उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *