News & View

ताज्या घडामोडी

भुजबळ, सदावर्ते,फडणवीसांना जरांगे पाटलांचा इशारा !

अंतरवली सराटी- मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ, ऍड गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी या ठिकाणी आयोजित लाखोंच्या सभेत जरांगे पाटील कडाडले.22 ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

आज अंतरवाली सराटीत मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी महासंवाद मेळावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी ते बोलत असताना म्हणाले की, ” मराठा समाज एक होत नाही असं बोलणाऱ्यांना या गर्दीने उत्तर दिलं आहे. कोण म्हणतो मराठा एक होत नाही. यांना समाजावून सांगा आरक्षण घ्यायला आला की कशाला आला आहात ते.”पुढे बोलत असताना ते म्हणाले की,”आपल्या मराठा समाज्याच्या मुळ मागणी आरक्षण, नेमकं कोण आहे जे मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या मध्ये येत आहे? नेमक कोण आरक्षण देत नाही हे ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत.सरकारला विनंती आहे की, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी ३० दिवस हातात उरलेले आहेत. आज जो जनसागर उसळला आहे त्यांची ही मागणी आहे की, राहीलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

महाराष्ट्रातील समस्त मराठा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे,मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा,कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या ४५ बांधवाना सांगितलेला निधी व सरकरारी नोकरी द्यावी,दर १० वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवाचा सर्व्हे करावा,सारथी संस्थेमार्फत पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावे,वेगळा प्रवर्ग करुन टिकणार आरक्षण द्या या मागण्या यावेळी त्यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *