News & View

ताज्या घडामोडी

परळीत मर्डर ! कायदा सुव्यवस्था धाब्यावर !!

परळी- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी शहरात दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत.चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणीची घटना ताजी असतानाच पहाटे महादेव मुंडे या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे.

परळी तालुक्यातील भोपळा या गावचे रहिवासी असलेले महादेव मुंडे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

परळी मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून गुंडगिरी, मारामारी,धमक्या असे प्रकार वाढीस लागले आहेत.चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती.या प्रकरणात पोलिसांनी थातुरमातुर कलमाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान रविवारी सकाळी खुनाची ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *