News & View

ताज्या घडामोडी

ऊसतोड मजुरांचा कोयता बंद !

बीड- ऊसतोड मजूर,मुकादम,वाहतूकदार यांच्या मजुरी आणि कमिशन मध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी कोयता बंद चा ईशारा संघटनेने दिला आहे.याबाबत आयोजित पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने दुसरी बैठक होणार आहे अशी माहिती प्रा सुशीला मोराळे यांनी दिली.

2023/2024 हे वर्ष ऊसतोडणी मजूर वाहतूकदार कामगार व मुकादम याचे मजुरीत वाढ कमिशन मध्ये वाढ करण्याचे वर्ष आहे 27/10/2020 मध्ये 14% मजुरीत वाढ आणि मुकादम कमिशन मध्ये अर्धा टक्के वाढ यावर तडजोड झाली होती. त्यानंतर या वर्षीची ही पहिलीच बैठक होती. दरवाढ व कमिशन वाढ या बाबत दोन्ही गटाकडून प्रस्ताव दिले गेले ऊसतोड संघटनांनी गुजरातचा दरवाढ 476 मध्यप्रदेश 390 आहे मागील करतात 273 इतका दर दिला होता तो अपूरा आहे. महागाईने कहर केला आहे तेंव्हा दुप्पट दरवाढ करा. असा प्रस्ताव सिटू संघटनेच्या दत्ता डाके तसेच ऊसतोड मजूर संघटनेचे प्रतिनिधी विष्णू जायभाये, पाटणे, शगहिनीनाथ थोरे, दत्तोबा भांगे, तात्यासाहेब हुले, आबासाहेब चौघुले बबनराव ढाकणे यांच्या ऊसतोड संघटनेच्या नेत्या प्रा.सुशीला ताई मोराळे तसेच जीवन राठोड यांनी दिला होता

मात्र अपुरा पाऊस सिझन केवळ 2 महिनेच चालणार म्हणून दुप्पट दरवाढ देता येणार नाही 10% दर वाढीचा प्रस्ताव साखर संघाचे अध्यक्ष बी.आर. पाटील, उपाध्यक्ष प्रकाश सोळंके ,हर्षवर्धन पाटील जयप्रकाश दांडेगावकर यांच्या तर्फे देण्यात आला होता सरकारचे प्रतिनिधी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही बाजू मांडली साखर संघाचे एम डी श्री खताळ हेही उपस्थित होते मात्र ऊसतोड संघटना प्रतिनिधी नी आम्हाला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगितले आता पुन्हा दुसरी बैठक घेऊ असे माननीय दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले

या बैठकीत योग्य तोडगा निघू शकला नाही म्हणून बोलणी फिस्कटली आहेत अशी माहिती प्रा. सुशीला ताई मोराळे यांनी दिली आहे.पुढील बैठकीत योग्य तोडगा निघू शकला नाही तर कोयता बंद आंदोलन करू असा इशारा ही हुले, जायभाये, दत्तोबा भांगे, सह विविध नेत्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *