Category: बीड
-

भाशिप्र पाठोपाठ चंपावती शिक्षण संस्थेच्या चौकशीचे आदेश!
बीड –बोगस शालार्थ आयडी, नोकर भरती आणि इतर गैरप्रकार बाबत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या चौकशी पाठोपाठ बीडमधील नावाजलेल्या चंपावती शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत. किरण देशपांडे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती,…
-

भाशिप्र मधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती!
बीड -भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड व इतर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व कर्मचारी भरती बाबत प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण देशपांडे यांच्या तक्रारी वरून शिक्षण उपसंचालक यांनी ही समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे आता या संस्थेत बोगस…
-

भुमाफियानी करपरा नदी केली गिळंकृत!
बीड – बीडच्या भूमाफियांनी अक्षरशः नदीपात्र गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष बाब म्हणजे नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेत नदीवर करण्यात आलेले अतिक्रमण अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील सुमती नगर भागात करपरा नदीच्या मधोमध भिंत घालून भूमाफियांनी नदी गिळंकृत करत प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे राज्याच्या पर्यावरण…
-

आवक जावक खाडाखोड प्रकरणी चौकशी समिती गठीत!
बीड –बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात आवक जावक रजिस्टर मध्ये झालेल्या खाडाखोड प्रकरणात शिक्षण उपसंचालक यांनी त्रिस्तरीय समितीचे गठण केले आहे. हिंगोलीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण…
-

एस आय टी च्या तपासात बीड जिल्ह्यात आवक जावक मध्ये खाडाखोड!
बीड – बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीच्या तपासात बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आले आहेत 2012 ते 2025 या काळात बोगस आवक जावक क्रमांक टाकून शिक्षकांची संच मान्यता देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे बीड जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांनी ही बोगसगिरी केल्या मुळे अनेक जण अडचणीत येणार आहेत बीडच्या शिक्षण विभागाने…
-

मुख्याध्यापक, शिक्षकाने उचलले इन्कम टॅक्स चे लाखो रुपये!
बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थेचा आणखी एक कारभार उजेडात आला आहे. या संस्थेच्या बीड मधील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स चे तब्बल पंधरा लाख रुपये उचलून घेतले. मात्र संस्थेने ही बाब उजेडात आल्यानंतर बदली आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्या पलीकडे कोणतीच…
-

अविनाश पाठक यांचा जामीन नामंजूर!
बीड– येथील विशेष प्रकरण क्रमांक 181/2026 मध्ये माजी जिल्हाधिकारी अविनाश प्रभाकर पाठक यांना जामीन मिळण्याच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे. नियमित जामीन अर्ज यापूर्वीच गुणवत्तेच्या (merits) आधारावर नामंजूर झाल्यानंतर, आता त्यांनी दाखल केलेला डिफॉल्ट/स्टॅट्युटरी जामीन अर्जही अतिरिक्त सत्र न्यायालय, बीड यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी स्पष्टपणे नामंजूर केला आहे. न्यायालयीन नोंदीनुसार, अविनाश पाठक यांना 7…
-

महिलेच्या पोटात ग्लोज अन टीश्यू पेपर!जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार!
बीड –बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शल्य चिकित्सक डॉ सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे समोर आले आहे. सिझेरियन केलेल्या एका महिलेच्या पोटात ग्लोव्हज आणि टीश्यू पेपर राहिल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे. आरोग्य खात्याचे कारनामे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोर्या रूग्णांच्या मुळावर उठला आहे. बाळांतपणासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या एका…
-

70 हजाराची लाच घेताना तलाठी जेरबंद!
गेवराई -अवैध वाळू उपसा सुरु ठेवण्यासाठी तब्बल 70 हजाराची लाच स्वीकारताना तलाठी विलास मोराळे याला छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे अगोदरच वाळू चोरी प्रकरणात सक्तीच्या रजेवर असताना आता तलाठी पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांना महसूल प्रशासनाने…
-

दादा आणि वहिनींच्या कामात फरक!सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आ क्षीरसागर यांची नाराजी!
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कारभारावर थेटपणे नाराजी व्यक्त करत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दादा आणि वहिनीच्या कारभारात जमीन आसमान चा फरक आहे वहिनी आणि पी एस च्या सांगण्यावरून बीडमध्ये कारभार हाकत आहेत त्यामुळे विकासाची कामे जाणीवपूर्वक रोखून धरले जात आहेत असा…

