News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1790249238775 1

दुष्काळाच्या मागणीसाठी पवार, क्षीरसागर यांचा मोर्चा!

बीड -राज्यातील शेतकरी अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडला आहे, सरकारने तातडीने दुष्काळ जाहिर करून त्याला आधार द्यावा अन्यथा सरकारच्या विरोधात जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन उभे करावे लागेल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस आहे रोहित पवार यांनी दिला.

आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बीड जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी बांधवांना तातडीने आवश्यक मदत व सवलती द्याव्यात, या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.आहे संदीप क्षीरसागर, माजी आ सय्यद सलीम, माजी आ उषाताई दराडे, माजी आ पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर निर्माण झालेली परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यांच्या हक्काची मदत मिळवून देणे, हा या आंदोलनामागचा प्रमुख उद्देश आहे.

शासनाने बीड जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना आवश्यक सवलती द्याव्यात,अशी मागणी यावेळी बोलताना आ संदीप क्षीरसागर यांनी केली.

आजचा हा मोर्चा केवळ आंदोलन नाही, तर संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हक्काचा बुलंद आवाज आहे, सरकारने या बळीराजाला दुष्काळ जाहिर करून आधार द्यावा अशी मागणी आ रोहित पवार यांनी केली.

मोर्चा मध्ये बीड जिल्ह्यातून हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version