News & View

ताज्या घडामोडी

23d8531f2195576a5ea5c6e5f6c55d871744518335315892 original

निकालाची प्रत द्यायला दीड महिना उशीर :दुष्काळात शेतकऱ्याला छळण्याचा तहसीलदार यांचा प्रताप!

पाटोदा -महसूल विभागाचे अधिकारी किती निगरगट पद्धतीने काम करतात याचा नवा अनुभव पाटोदा येथील एका शेतकऱ्याला आला आहे. बांध रस्ता खुला करण्याचा निर्णय दिल्यानंतर देखील दीड महिन्याने त्याची प्रत शेतकऱ्याच्या हाती देण्यात आली. पाटोद्याचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी कोणाच्या राजकीय दबावाखाली हे कुटाणे केले याची चर्चा सुरु आहे. दप्तरं दिरंगाई करणाऱ्या  तहसीलदार यांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणारं का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील सर्वे नंबर ८७६व ८७७मधील शेतातील नंबर बांध रस्ता खुला करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात तहसीलदारांनी १३ ऑक्टोबर२०२६ रोजी निकाल दिला. मात्र, या निकालाची प्रत संबंधित शेतकऱ्याला प्रत्यक्षात तब्बल २६ नोव्हेंबर२०२६ रोजी देण्यात आली. त्यामुळे १३ ऑक्टोबर२०२६ रोजी निकाल दिल्यानंतर तो शेतकऱ्याला देण्यासाठी २६ नोव्हेंबर२०२६पर्यंत विलंब का करण्यात आला, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.


एकीकडे शेतकरी दुष्काळाने मेटाकुटीला आला आहे.दुसरीकडे महसुल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांला त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. शेतात जाण्या-येण्यासाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत बांध रस्ता खुला करण्याबाबतच्या प्रकरणाचा निकाल वेळेत संबंधित शेतकऱ्याला मिळणे अपेक्षित होते.

मात्र, १३ ऑक्टोबर२०२६ रोजी निकाल देऊनही त्याची प्रत २६नोव्हेंबर२०२६ रोजी देण्यात आल्याने या विलंबामागचे नेमके कारण काय, निकालाची प्रत इतके दिवस का रोखून ठेवण्यात आली, याबाबत तहसील कार्यालयाने स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक कारभार करावा आणि निकालाच्या प्रती देण्यास होणारा विलंब थांबवावा, अशी मागणी होत आहे.

राजकीय दबावामुळे तहसीलदार यांनी निकालाची प्रत तब्बल ४४दिवस का दडवुन ठेवली असावी, बीड जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांच्यावर निकाल उशिरा का दिला याबाबत कारवाई करुन शेतकऱ्याला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version