News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल प्रथमा/ प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. २५ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दु. १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/४२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩


‼️दैनिक राशी भविष्य ‼️

‼️दिनांक २५ नोव्हेंबर २०२६‼️

मेष:- साधारण दिवस आहे. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. मित्र सहकारी यांची साथ लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. उपासना धार्मिक कार्यात सहभागी व्हावे.

वृषभ:- उत्साह वाढेल आत्मविश्वासपूर्वक कामात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरणात सामंजस्य राखा. आर्थिक लाभ होतील.

मिथुन:- अनावश्यक खरेदी टाळावी. नियोजित कार्यातप्रगती साधेल महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कुटुंबातील वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. मन प्रसन्न ठेवण्यासाठी ध्यान उपासना करावी.

कर्क:- विचारपूर्वक कृती करावी. मित्रमंडळींच्या सहकार्याने काही कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. समाजकारण राजकीय विषय काही प्रमाणात तणावपूर्ण असू शकतात.

सिंह:- कामातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. काम करताना काळजी घ्या. वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. हितचिंतक काही प्रमाणात अडथळे निर्माण करु शकतात.

कन्या:- विचारपूर्वक नियोजन करा. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. कौतुकास्पद काम कराल. कौटुंबिक जीवनात आनंदी दिवस आहे.

तूळ:- अनावश्यक खर्च टाळावा. बोलण्यात संयम ठेवावा आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही वादात पडू नका. संयमाने परिस्थिती हाताळा. उपासना धार्मिक कार्यात सहभागी व्हावे.

वृश्चिक:- मनाचा चंचलपणा राहील त्यामुळे भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार काळजीपूर्वक करा. इतरांच्या बोलण्यावरून त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. मित्र सहकारी यांची मदत होईल.

धनु:- नवीन योजना राबविण्यात येतील कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वागताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात कोणतीही जोखीम घेऊ नका. कौटुंबिक जीवनात आनंदी दिवस आहे.

मकर:- चांगला दिवस आहे. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आपण त्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

कुंभ:- नियोजन पूर्वक काम साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरणात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भेटी गाठी साठी चांगला दिवस आहे. नविन जबाबदारी स्वीकारताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

मीन:- प्रभावशाली व्यक्तिमत्व वाढवून इतरांवर प्रभाव पाडाल. बोलताना संयमाने शब्द वापरने हितकारक होईल. कौटुंबिक काही मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या. हितसंबंध जपावे यांच्यासाठी काही वेळा काम सोडून द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version