News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

    धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

    नवी दिल्ली -केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. गेल्या महिना भरपासून नीट पेपर लीक आणि प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु होतं. कॉक्रोच जनता पार्टी च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होतं. या आंदोलनानंतर…

  • माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

    माजलगावच्या संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड!

    माजलगाव -गुलजार ए रजा या ट्रस्टने माजलगाव येथील एका संस्थेच्या वेगवेगळ्या अकाउंट वर तब्बल 4 कोटी 73 लाख रुपये देणगी जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढी मोठी रक्कम जमा करणाऱ्या संस्थेचे पाकिस्तान मधील दावत ए इस्लामी या संस्थेशी संबंध असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता माजलगाव येथील संस्था देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली…

  • सुप्रिया सुळेच्या व्याह्यांना भाजपकडून उमेदवारी!

    सुप्रिया सुळेच्या व्याह्यांना भाजपकडून उमेदवारी!

    मुंबई -स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून ११ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष नितीन नबीन आणि इतरही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर रविवारी रात्री साडे वाजता भाजपने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवर भाजप सुप्रिया सुळे यांचे…

  • रेनीसन च्या डॉ शिरूरे मुळे भाशिप्र येणार अडचणीत!

    रेनीसन च्या डॉ शिरूरे मुळे भाशिप्र येणार अडचणीत!

    लातूर -नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होतं आहेत. लातूरचा शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांची अटक झाल्यानंतर डॉ मनोज शिरूरे यांनाही अटक करण्यात आली आहे. हे महाशय भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अनधिकृत असलेल्या रेनीसन इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष आहेत हे विशेष. त्यामुळे या तपासात पेपरफुटीचे धागेदोरे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेपर्यंत पोहचल्यास आश्चर्य वाटायला नको.मोटेगावकर…

  • नीट प्रकरणात अंबाजोगाई च्या दोन विद्यार्थ्यांची चौकशी!

    नीट प्रकरणात अंबाजोगाई च्या दोन विद्यार्थ्यांची चौकशी!

    अंबाजोगाई –देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्हा-सह अंबाजोगाईत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ भागातील एकाच घरातील दोन विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली आहे.दोन संशथित विद्यार्थ्याची तब्बल दोन तास कसून चौकशी केली.विशेष म्हणजे या दोन विद्यार्थ्याना…

  • नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

    नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

    पुणे – नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर मधून तिघांना अटक केली आहे. यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी लातूर येथील एका क्लास चालकाची देखील चौकशी सुरु केली आहे. या क्लास चालकाने मॉक टेस्ट मध्ये घेतलेल्या प्रश्नापैकी 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याने…

  • नीट ची परीक्षा रद्द!

    नीट ची परीक्षा रद्द!

    नवी दिल्ली –पेपरफुटी मुळे मेडिकल नीट ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरातून तब्बल 22 लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून परीक्षेतील गोंधळावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून यातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी…

  • ममता ला धक्का, भाजपची तीन राज्यात एकहाती सत्ता!

    ममता ला धक्का, भाजपची तीन राज्यात एकहाती सत्ता!

    नवी दिल्ली -पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी ला सुरवात झाल्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या तीन राज्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, काँग्रेस ने केरळचा डाव्यांचा गड उध्वस्त केला आहे तर तामिळनाडू मध्ये विजय थलपती यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचा…

  • आप ला धक्का :राघव चढा सहित तीन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

    आप ला धक्का :राघव चढा सहित तीन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

    नवी दिल्ली -आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. खासदार राघव चढा यांच्यासह तीन खासदारांनी पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चढा यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर राज्यसभेत आवाज उठवल्यानंतर आप ने त्यांना राज्यसभेत बोलण्यासाठी बंदी घातली होती. त्यानंतर त्यांच्या या निर्णयामुळे आप ला मोठा धक्का बसला आहे. राघव चड्ढा यांच्यासोबतच राज्यसभा खासदार अशोक मित्तल…

  • महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!

    महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!

    मुंबई – 900 पेक्षा अधिक चित्रपटातून 12 हजार पेक्षा जास्त गाणी गायलेल्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले. आशाताईच्या निधनाने देशाने एक श्रेष्ठ गायिका गमावली आहे. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केले होते. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक…

Exit mobile version