नवी दिल्ली -पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी ला सुरवात झाल्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या तीन राज्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, काँग्रेस ने केरळचा डाव्यांचा गड उध्वस्त केला आहे तर तामिळनाडू मध्ये विजय थलपती यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे.
यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशाप्रकारची रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 190
तृणमूल काँग्रेस- 94
काँग्रेस -2
डावे पक्ष- 2
इतर-2
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल
द्रमुक- 60
अण्णाद्रमुक-65
टीव्हीके-109
इतर-9
केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल
काँग्रेस-98
डावी आघाडी -40
इतर-2
आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-97
काँग्रेस- 24
इतर-5
पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 22
काँग्रेस-6
इतर-1





Leave a Reply Cancel reply