News & View

ताज्या घडामोडी

Category: महत्त्वाच्या

  • एस आय टी च्या तपासात बीड जिल्ह्यात आवक जावक मध्ये खाडाखोड!

    एस आय टी च्या तपासात बीड जिल्ह्यात आवक जावक मध्ये खाडाखोड!

    बीड – बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीच्या तपासात बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आले आहेत 2012 ते 2025 या काळात बोगस आवक जावक क्रमांक टाकून शिक्षकांची संच मान्यता देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे बीड जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांनी ही बोगसगिरी केल्या मुळे अनेक जण अडचणीत येणार आहेत बीडच्या शिक्षण विभागाने…

  • 70 हजाराची लाच घेताना तलाठी जेरबंद!

    70 हजाराची लाच घेताना तलाठी जेरबंद!

    गेवराई -अवैध वाळू उपसा सुरु ठेवण्यासाठी तब्बल 70 हजाराची लाच स्वीकारताना तलाठी विलास मोराळे याला छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे अगोदरच वाळू चोरी प्रकरणात सक्तीच्या रजेवर असताना आता तलाठी पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांना महसूल प्रशासनाने…

  • परभणीचे सीएस आणि डीएचओ सस्पेंड!

    परभणीचे सीएस आणि डीएचओ सस्पेंड!

    परभणी -गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणी परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मोरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजय पांचाळ या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य सेवेतील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.परभणीच्या जिंतूर येथील शेख अमीना शेख आयुब या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला परभणी स्त्री जिल्हा रुग्णालयात…

  • एटीएस चे माजलगावात छापे!

    एटीएस चे माजलगावात छापे!

    माजलगाव –माजलगाव येथील एका संस्थेचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्यानंतर एटीएसच्या पथकाने बुधवारी माजलगावात येऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उस्मानिया फाउंडेशन करिता गरीब लोकांच्या मदतीसाठी पैसे गोळा करून स्वतःच्याच खात्यात पैसेजमा जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून…

  • आधीचे जगले नाही अन नव्याने लाखो झाडं लावायचा आदेश!

    आधीचे जगले नाही अन नव्याने लाखो झाडं लावायचा आदेश!

    बीड -शासनाचा आदेश आला कि यंत्रणेने कामाला लागायचे, कागदावर आदेशाचे पालन करायचे अन पाठ थोपटून घ्यायची ही सवय सगळ्यांचं प्रशासकीय यंत्रणेला लागलेली आहे. याचा अनुभव बीड जिल्ह्यात तर नित्याचाच झाला आहे. गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात 70 लाख झाडं लावण्यात आली. मात्र ती फक्त कागदावरच लावली होती हे आता…

  • पाच हजाराची लाच :कार्यकारी अभियंता जाळ्यात!

    पाच हजाराची लाच :कार्यकारी अभियंता जाळ्यात!

    अंबाजोगाई –महावितरण चा अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता मनिष ढाकरे याला पाच हजार रुपयाची लाच घेताना जेरबंद करण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खात्री केल्यानंतर सापळा लावण्यात आला. यामध्ये संबंधित कार्यकारी अभियंता मनिष ढाकरे याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्याला पाच हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल…

  • इतकी वर्ष बीडचे एफडीए वाले झोपले होते का?

    इतकी वर्ष बीडचे एफडीए वाले झोपले होते का?

    बीड – अन्न व औषध प्रशासन विभाग बीडच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे छापा घालून 35 हजार रुपयांचा बनावट खवा व केमिकल जप्त केले गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर सहित जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दूध दही खवा पेढे या सहित हॉटेल मध्ये देखील भेसळ होते हे उघड आहे मग आता धाडी टाकणारे एफडीएवाले इतकी वर्ष झोपले होते…

  • बीडमध्ये मतदारांच्या गोपनीयतेचा भंग!

    बीडमध्ये मतदारांच्या गोपनीयतेचा भंग!

    बीड -केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदार यादी पुनरावलोकन कार्यक्रम राबविण्यात येतं आहे. मात्र यामध्ये बीड जिल्ह्यात मतदार याद्या तयार करणाऱ्या कंत्राटदारकडून या योजनेचा बोजवारा उडवला जातं आहे. मतदारांचा डेटा गोपनीय ठेवण्याच्या सूचना असताना बीड शहरातील कोणत्याही झेरॉक्स सेंटर वरती या याद्या तयार करण्याचे काम सुरु असल्याने गोपनीयता धोक्यात आली आहे. सध्या बीड जिल्ह्यासह देशभरात…

  • उद्धव ठाकरेंना धक्का :सचिन अहिर यांना उपसभापती पदाची शिंदेकडून उमेदवारी!

    उद्धव ठाकरेंना धक्का :सचिन अहिर यांना उपसभापती पदाची शिंदेकडून उमेदवारी!

    मुंबई –राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत प्रवेश करणारे आणि नंतर विधानपरिषद पदरात पाडून घेणारे सचिन अहिर यांना विधानपरिषद उपसभापती पदाची उमेदवारी शिंदे यांनी दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय भूकंप आला आहे. अहिर यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः…

  • नसरापूर प्रकरणातील आरोपी कांबळे ला फाशी!

    नसरापूर प्रकरणातील आरोपी कांबळे ला फाशी!

    पुणे –नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अवघ्या दोन महिन्यात या खटल्याचा तपास आणि निकाल आल्याने पीडित कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने काही दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याने पीडितेला खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिला घेऊन गेला.…

Exit mobile version