News & View

ताज्या घडामोडी

pudhari import wp content uploads 2022 07 6 5 1

एस आय टी च्या तपासात बीड जिल्ह्यात आवक जावक मध्ये खाडाखोड!

बीड – बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीच्या तपासात बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आले आहेत 2012 ते 2025 या काळात बोगस आवक जावक क्रमांक टाकून शिक्षकांची संच मान्यता देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे बीड जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांनी ही बोगसगिरी केल्या मुळे अनेक जण अडचणीत येणार आहेत बीडच्या शिक्षण विभागाने मात्र याबाबतीत नेहमीप्रमाणे हात वर केले आहेत.

नागपूर जळगाव नाशिक अमरावती या जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेत रुजू करून घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात आत्तापर्यंत 30 ते 40 जणांना अटक झालेली आहे.

त्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील शालार्थ आयडी तपासणीसाठी नियुक्त केलेल्या एसआयटी समोर जे पुरावे उपलब्ध झाले आहेत त्यामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

बीड जिल्ह्यात भारतीय शिक्षणाचा प्रसार करायचा या नावाखाली उभारले गेलेल्या संस्थेच्या अध्यक्ष कार्यवाह सहकार्यवाह यांनी त्यांच्या संस्थेसहित इतर अनेक संस्थांमध्ये बोगस नोकर भरती केल्याचे तपासात समोर आले आहे. बीडच्या शिक्षण विभागात 2012 ते 2025 या काळात नोकरीस असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगसह घेऊन मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या शालार्थ आयडी काढण्यात आले.

2012 साली शिक्षणाधिकारी असलेले देवगुडे यांच्या मागील तारखेतील सह्या घेऊन खोटे आवक जावक क्रमांक टाकून घोळ घालण्यात आला आहे जवळपास दीड हजार बोगस जावक क्रमांक टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. एसआयटीने अद्याप बीड जिल्ह्यात येऊन तपासणी केलेली नाही मात्र संस्थांकडून उपलब्ध झालेल्या आणि शिक्षण विभागातून मिळालेल्या कागदपत्रावरून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून नोकर भरती केल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा विस्तार लक्षात घेता एसआयटी तपासाला आणखी तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आली असून गेल्या वर्षभरापासून एसआयटी चे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील माहिती गोळा करून त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करून दलालांना तसेच बोगस शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याविरुद्ध कारवाई करत आहेत आता यासाठी आणखी मुदतवाढ मिळाल्याने अनेक बडे मासे यामध्ये अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेत कोणाचेही अप्रूव्हल काढायचे असेल किंवा नोकर भरती करायची असेल तर एकच मुळे नावाचा ग्रहस्थ हे सगळे प्रकरण हँडल करायचा बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यापासून उपसंचालक संचालक आणि शिक्षण सचिवापर्यंत त्याची मॅनेजमेंट लाईन होती त्यामुळे त्याने शेकडो लोकांना नोकरीला लावले आणि कोट्यावधी रुपये कमावले या सगळ्या बोगस कागदपत्रांचा भांडाफोड झाला असून बोगस आवक जावक क्रमांक असलेल्या अनेक अप्रुव्हलच्या ऑर्डर एसआयटीच्या हाती लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version