Category: गेवराई
-

70 हजाराची लाच घेताना तलाठी जेरबंद!
गेवराई -अवैध वाळू उपसा सुरु ठेवण्यासाठी तब्बल 70 हजाराची लाच स्वीकारताना तलाठी विलास मोराळे याला छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे अगोदरच वाळू चोरी प्रकरणात सक्तीच्या रजेवर असताना आता तलाठी पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांना महसूल प्रशासनाने…
-

दीड महिना झाला तरी वाळू चोरीतील तलाठी मंडळ अधिकारी पोलिसांना सापडेनात!
बीड -महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटून गेला तरी बीडच्या चकलंबा पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना वाळू चोरी प्रकरणातील आरोपी सापडले नाहीत. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील नदीपात्रातून ऑगस्ट 25 ते जून 26 या काळात घरकुल च्या नावाखाली वाळू उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप यातील एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. एकीकडे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक…
-

वाळू चोरी प्रकरणातील तहसीलदार खोमणे वर गुन्हा दाखल!
बीड – घरकुल च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची वाळू चोरी केल्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत दोषी ठरलेले गेवराईच्या तहसीलदार संदीप खोमणे यांच्याविरुद्ध त्यांच्या मूळ गावी एका मागासवर्गीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. वाळू चोरी प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापासून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झालेले खोमणे यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ…
-

टू व्हीलर वरून वाळू वाहतूक!तहसीलदार खोमणे यांचा आणखी एक प्रताप!
बीड – वाळू मुरूम अथवा खडी वाहतूक करण्यासाठी शक्यतो ट्रॅक्टर हायवा किंवा ट्रकचा वापर केला जातो शक्यतो चार-सहा दहा किंवा बारा चाकी वाहनातूनच वाळूची वाहतूक करणे शक्य असते मात्र तब्बल 25 ते 50 हजार ब्रास वाळूवर दरोडा घालून शासनाची 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे.…
-

वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!
बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंदिकेटने राक्षस भुवन गोदावरी पात्रातून 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळू चा उपसा करून घरकुल च्या नावाखाली या वाळूची चोरी केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे या प्रकरणात खोमणे यांच्यासहित 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात…
-

तहसीलदार अँड कंपनीवर नव्वद कोटींचा बोजा जिल्हाधिकारी टाकणार का?
बीड -गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे अँड कंपनीने राक्षसभुवन सहित गोदापात्रातून घरकुलच्या नावाखाली केलेल्या वाळू उपसा प्रकरणात मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यासह स्वतः तहसीलदार खोमणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या लोकांवर नीलम्बनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे उपसा केलेली वाळू, त्याची रॉयल्टी, पाचपट दंड लावून नव्वद कोटी…
-

तहसीलदार, मंडळ, तलाठी, ग्रामसेवक यांना शो कॉज, एजटांवर सुद्धा होणार गुन्हे दाखल!
बीड – राक्षस भवन येथून 25 हजार ब्रास पेक्षा अधिक वाळू बेकायदेशीरपणे उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासहित 15 गावचे मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार खोमणे अँड कंपनीने घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली उपसलेली वाळू ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून…
-

घरकुलच्या नावाखाली वीस हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा!
बीड -घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि इतरांनी तब्बल वीस हजार ब्रास पेक्षा जास्तच वाळूचा अवैध उपसा केल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणेच्या कलेक्शन वाल्या लोकांनी आता घरकुल मंजूर झालेल्या लोकांना मॅनेज करण्याची धडपड सुरु केली आहे. सर्व दहा पथकांचे अहवाल प्राप्त होताच तहसीलदार यांच्यासह लाभार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती…
-

प्रशासनाचे वरातीमागून घोडे!वाळू उपसा बंद झाल्यावर कलेक्टर स्पॉटवर गेले!
बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांची वाळू चोरी केल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी राक्षस भुवन आणि इतर ठिकाणची पाहणी करण्याचे नाटक केले 40 कर्मचाऱ्यांचे पथक घरकुल लाभार्थ्यांना विवाह मिळाली की नाही ते पाहण्यासाठी नेमले मात्र टेंडर बंद…
-

अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!
गेवराई – गेवराई तालुक्यात तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या टीमने शंभर कोटी रुपयांचा वाळू उपसा केल्याचा खळबळ जनक आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी त्यांच्या पथकासह रविवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात हायवा जप्त केल्या. विशेष बाब म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी वाळू माफियांवर कारवाई केली असली तरी सायंकाळ नंतर…


