बीड – घरकुल च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची वाळू चोरी केल्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत दोषी ठरलेले गेवराईच्या तहसीलदार संदीप खोमणे यांच्याविरुद्ध त्यांच्या मूळ गावी एका मागासवर्गीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. वाळू चोरी प्रकरणात गुन्हा दाखल होण्यापासून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झालेले खोमणे यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी ऑगस्ट 2025 ते जून 2026 या दहा महिन्याच्या काळात घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली 25 हजार ब्रास पेक्षा अधिक वाळूचा उपसा केल्याचा ठपका जिल्हाधिकारी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला होता.
याप्रकरणी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील पोलीस हवालदार यांच्यासहित 19 जणांवर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता मात्र या कारवाईतून संदीप खोमणे हे वाचले होते त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे मात्र आठवडा झाला तरी त्यावर अद्याप शासनाकडून तसलीच कारवाई झालेली नाही.
दरम्यान खोमणे यांच्या मूळ गावी त्यांनी एका मागासवर्गीय व्यक्तीला व्हाट्सअप ग्रुप वरून अर्वाच्या भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या व्यक्तीने केली होती यामध्ये राजकीय दबाव आल्यामुळे खोमणे वर्षभरापासून वाचत होते अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार खोमणे यांच्यावर माळेगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.





Leave a Reply Cancel reply