बीड -महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटून गेला तरी बीडच्या चकलंबा पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना वाळू चोरी प्रकरणातील आरोपी सापडले नाहीत. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील नदीपात्रातून ऑगस्ट 25 ते जून 26 या काळात घरकुल च्या नावाखाली वाळू उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप यातील एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. एकीकडे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेसाठी तत्परता दाखवणारे बीड पोलीस या प्रकरणी मात्र का गप्प आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील नदीमधून तहसीलदार संदीप खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यासाठी 25 हजार पेक्षा जास्तच वाळूचा उपसा केला. या प्रकरणी न्यूज अँड व्यूज ने सातत्याने पाठपुरावा केला तसेच गेवराईचे आ विजयसिंह पंडित यांनी तक्रार केली.
त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशी समितीचे गठण केले. यामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस आणि काही एंजट अशा 19 लोकांवर महिना सव्वा महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले. ज्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे.
- किरण दांडगे, ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, गेवराई
- गोविंद ढाकणे, ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, गेवराई
- विश्वजीत शेंबडे पाटील, खाजगी संगणक चालक, तहसिलकार्यालय, गेवराई
- शुभम गायकवाड, महसूल सेवक, तहसिल कार्यालय, गेवराई
- गोविंद दिलीप मगर रा धुमेगाव ता. गेवराई मो.नं. 9730414050
- योगेश दिलीप मगर रा.धुमेगाव ता. गेवराई मो.नं. 9359165445
- अशोक चवकर मो. नं. 9822813350
- मुकेश उद्धव बोराडे उपसरपंच गंगावाडी
- दादासाहेब रमेश माळी रा. बेलगाव मो. नं 8805198678
- यासीन तांबोळी रा. हिरापूर ता. गेवराई मो.नं. 9273333136
- अमोल अप्पासाहेब लाखे रा. एरंडगांव ता. गेवराई जि.बीड मो. नं. 9422979780
- शितल शिवाजी धोंडरे, सामाजिक कार्यकर्ता, रा. देवी मंदिराजवळ जातेगाव
- भागवत राधाकिसन जाधव, सरपंच मौजे बेलगुडवाडी ता. गेवराई मो.नं. 9403789384
- कल्याण पवार (पोलीस) रा.उमापूर ता. गेवराई मो.नं 9075125669* *15. के.एम. पवार रा. उमापूर ता. गेवराई
- सोहेल सोदागर रा. उमापूर 8530454902
- शाहरुख मुसा पठाण रा. गढी ता. गेवराई मो.नं.9552949234
- अजय चाळक ग्रामपंचायत सेवक मो.नं 7823856643
- बाबासाहेब तुकाराम सांगळे रा. भायाळ ता. पाटोदा जि.बीड मो. न 9011536367
या सर्व लोकांचे प्रकरण वीस दिवसापूर्वी तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या दरम्यान या आरोपीनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर अद्याप पर्यंत या आरोपीना अटक झालेली नाही.
हे आरोपी गेवराई आणि आपल्या गावात बिनधास्त फिरत असताना पोलिसांना मात्र कसकाय सापडत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतं आहे. पोलिसाचे हात कशाने बांधले गेले आहेत, शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरोपीना पोलीस का पाठीशी घालत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.





Leave a Reply Cancel reply