गेवराई – गेवराई तालुक्यात तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या टीमने शंभर कोटी रुपयांचा वाळू उपसा केल्याचा खळबळ जनक आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी त्यांच्या पथकासह रविवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात हायवा जप्त केल्या. विशेष बाब म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी वाळू माफियांवर कारवाई केली असली तरी सायंकाळ नंतर स्वतः तहसीलदार खोमणे आणि त्यांच्या बगलबच्यांनी याच राक्षस भुवन भागातून घरकुल च्या नावाखाली शेकडो हायवा मधून वाळू वाहतूक करत लाखो रुपये छापले अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
गेवराई तालुक्यात अधिकृतपणे केवळ दोनच वाळूचे लिलाव सुरू आहेत या व्यतिरिक्त सावळेश्वर म्हाळस पिंपळगाव बोरगाव राक्षस भुवन अशा ठिकाणावरून अवैध पद्धतीने दररोज हजारो हायवा मधून वाळूची बेसुमार वाहतूक केली जाते.
गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे राक्षसभुवन चे मंडळ अधिकारी चांदणे , तलाठी ढाकणे तसेच इतर कर्मचारी हे स्वतः राक्षस भुवन येथील गणपती पॉईंट येथे थांबून दररोज 400 ते 500 हवा मधून घरकुल च्या नावाखाली बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करतात.
गेवराईच्या तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घरकुलच्या नावाखाली जो काही नंगानाच सुरू केला आहे त्याबाबत न्यूज अँड न्यूजने वृत्त प्रसारित केल्यानंतर देखील उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही कदाचित जाधव आणि खोमणे यांचीच वाळूच्या धंद्यात पार्टनरशिप असावी अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच कदाचित स्वतः अप्पर जिल्हाधिकारी धार्मिक यांना फिल्डवर उतरण्याची वेळ आली असावी अशी चर्चा आहे.
गेवराई चे तहसीलदार खोमणे यांनी शंभर कोटी रुपयांची वाळू विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी बीडच्या गौण खनिज विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राक्षस भुवन रस्त्यावरून येणाऱ्या सात हायवा पकडून जप्त केल्या या कारवाईचे वेळी तहसीलदार मात्र गायब होते.
अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी स्वतः सात वाहने पकडून गेवराई पोलीस ठाण्यात लावल्यानंतर 24 तास उलटले तरी देखील याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चकलांबा पोलीस ठाण्यात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलिसांना हे प्रकरण मॅनेज तर करायचे नाही ना अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे.
विशेष बाब म्हणजे ही कारवाई दिवसा झाली आणि सायंकाळ नंतर पुन्हा एकदा तहसीलदार खोमणे चांदणे आणि ढाकणे यांनी मिळून घरकुल च्या नावाखाली रात्रीतून शेकडो गाड्या नदीपात्रात उतरवून मशीन द्वारे वाळू उपसा केला. याचाच अर्थ अपर जिल्हाधिकारी असो किंवा जिल्हाधिकारी कोणीही कारवाईसाठी आले तरी तहसीलदार संदीप खोमणे हे त्यांना भीक न घालता आपला रोजचा गल्ला गोळा करण्यात मशगुल असल्याचे चित्र आहे.





Leave a Reply Cancel reply