नवी दिल्ली -केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. गेल्या महिना भरपासून नीट पेपर लीक आणि प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु होतं.
कॉक्रोच जनता पार्टी च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होतं. या आंदोलनानंतर काँग्रेस ने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केले होते.
गेल्या महिनाभरापासून सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांचे आंदोलन सुरु होते नीट पेपर लीक नंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मदत द्यावी, मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत यासाठी हे आंदोलन सुरु होतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर एन टी ए मधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते तसंच वांगचूक यांचे उपोषण देखील सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले होते.
दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतल्यानंतर प्रधान यांचा राजीनामा होईल असे सांगितले जातं होते. अखेर त्यांनी शनिवारी आपला राजीनामा दिला.





Leave a Reply Cancel reply