News & View

ताज्या घडामोडी

Shashikant Hingonekar Jalgaon

शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांना अटक!

बीड -बीडचे माजी शिक्षणाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक शशिकांत हिंगोणेकर यांना बोगस शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.2015 ते 2017 या काळात ते बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते, तत्पूर्वी त्यांनी जळगाव येथे हा शालार्थ आयडी घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.

१६० कोटी रुपयांच्या गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना पोलिसांनी धुळ्यातून अटक केली आहे. २०११ ते २०१५ या काळात जळगाव जिल्ह्यात पदावर असताना त्यांनी २५९ जणांना बनावट मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हिंगोणेकर यांनी जळगाव मध्ये ज्याप्रमाणे घोटाळे करून बोगस शिक्षक भरतीला सहकार्य केले तशाच पद्धतीने त्यांनी बीडमध्ये देखील अनेक संस्थाचालक, कार्यवाह, सहकार्यवाह यांना मदत करून बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी घोटाळा केला असून त्याचा तपास सुरु झाला आहे.

१६० कोटी रुपयांच्या गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना पोलिसांनी धुळ्यातून अटक केली आहे. २०११ ते २०१५ या काळात जळगाव जिल्ह्यात पदावर असताना त्यांनी २५९ जणांना बनावट मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version