बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे आणि त्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांची वाळू चोरी केल्याचा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी राक्षस भुवन आणि इतर ठिकाणची पाहणी करण्याचे नाटक केले 40 कर्मचाऱ्यांचे पथक घरकुल लाभार्थ्यांना विवाह मिळाली की नाही ते पाहण्यासाठी नेमले मात्र टेंडर बंद झाल्यानंतर केलेले हे नाटक म्हणजे जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गेवराई तालुक्यात गोदावरी आणि सिंदफणा नदी काठावर असलेल्या अनेक गावांमधून बेकायदेशीर पद्धतीनं हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जातो राजकीय वरदहस्त असलेले कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी आमदार माजी मंत्री माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक जण यामध्ये सहभागी असतात.
मात्र यापूर्वी कधीच प्रशासनातील तहसीलदार पदावरील अधिकाऱ्याने स्वतःच वाळूमाफियाची भूमिका केल्याचे पाहायला मिळाले नाही यावेळी मात्र तहसीलदार संदीप खोमणे राक्षसभुवन चे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्यासहित वाळूपत्त्यातील सगळे तलाठी मंडळ अधिकारी गोळा करून खोमणे यांनी घरकुल च्या नावाखाली एक लाख ब्रास पेक्षा अधिक वाळू बेकायदेशीर पद्धतीने उपसा केली.
याबाबत अगदी उशिरा का होईना गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची एस आय ति मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. आमदारांचा आक्रमक पवित्र बघून झोपेचं सोंग घेतलेल्या जिल्हा प्रशासनाने कारवाईचे नाटक सुरू केले रविवारी अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि त्यांच्या पथकाने सात वाळू हायवा कारवाई करत पोलीस ठाण्यात लावल्या.
त्यानंतर सोमवारी स्वतः जिल्हाधिकारी हे आपल्या पथकासह राक्षस भुवन आणि इतर गोदापट्ट्यात फिरले ड्रोन च्या माध्यमातून एटीएस मोजणी देखील करण्यात आली त्याच सोबत आत्तापर्यंत ज्या ज्या घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर वाळू वाटप केल्याचे दाखवण्यात आले आहे त्यांना खरोखरच वाळू भेटली का याची चौकशी करण्यासाठी 40 कर्मचाऱ्यांचे पथक देखील नियुक्त केले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे गेल्या वर्षभरापासून झोपेत होते का दररोज कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर वाळू चोरी वाळू तस्करी अवैध उत्खनन आणि तहसीलदार खोमणे यांच्याकडून सुरू असलेली माफी यादी याबद्दल बातम्या येत असताना 9 जून पर्यंत जॉन्सन यांनी का वाट पाहिली यापूर्वी त्यांनी कारवाईचा बडगा का उघडला नाही एकदाही गोदापात्रात जाऊन सत्य परिस्थिती जाणून घ्यावी वाटली नाही का असे अनेक प्रश्न चर्चिले जात असून एटीएस मोजणी आणि कारवाईचे नाटक करून जॉन्सन हे त्यांचे एटीएम असलेल्या संदीप खोमणे यांना पाठीशी तर घालणार नाहीत ना अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे.





Leave a Reply Cancel reply