News & View

ताज्या घडामोडी

Screenshot
images 1

पदवीधर निवडणूक निविदा प्रक्रियेत घोळ!

बीड -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निविदा आणि दरपत्रक प्रक्रियेत मोठा गोंधळ आणि अपारदर्शकता असल्याचा गंभीर आरोप पुरवठाधारकांनी केला आहे. दरपत्रके स्वीकारल्यानंतर ती उघडण्याची कोणतीही तारीख आणि वेळ निश्चित न करता ही प्रक्रिया पार पाडली जात असल्याने संशय बळावला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.


४ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार अनेक एजन्सींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन दरपत्रके सादर केली. मात्र, ही दरपत्रके पुरवठाधारकांच्या समक्ष न उघडता गुप्तपणे हाताळली जात असल्याचा आक्षेप घेत शासनाच्या ३० ऑक्टोबर २०१५ च्या नियमावलीचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले. दरपत्रके कधी आणि कोणाच्या उपस्थितीत उघडली जाणार, याची कोणतीही अधिकृत माहिती कागदपत्रांवर नमूद नाही. नियमानुसार पुरवठाधारकांच्या उपस्थितीत दरपत्रके उघडून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे बंधनकारक असताना या प्रक्रियेला बगल देण्यात आली.९ ऑक्टोबर २०२६ पासून आजपर्यंत या प्रक्रियेत किती निविदाधारकांनी सहभाग घेतला, याची कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी विनोद पिंगळे, विनोद चरखा, शरद सावळे, श्रीराम पटेल, दीपक शेटे, सुनील बडे यांच्यासह इतर पुरवठाधारकांनी केली आहे. आता या गंभीर आरोपांनंतर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशीचे आदेश देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version