बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाला जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे या सदस्यांवर अपात्र करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
ही निवडणूक झाल्यानंतर आरक्षित वार्डाचा निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सहा महिन्याच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक होतं. त्यानंतर मात्र एक वर्षाची मुभा वाढवून देण्यात आली होती. तरी देखील बीड जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केलं नाही. त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
Leave a Reply