बीड -पटसंख्या मॅनेज करण्यासाठी केलेले कुटाणे अखेर चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. शिक्षणाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या गटशिक्षणाधिकारी गंगाखेडकर यांच्या तक्रारी वरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बीडमधील स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थापन झालेल्या चंपावती शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन वर्षात पट पडताळणी मध्ये स्वतः सहित आठ ते दहा शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरू नयेत म्हणून जास्तीचे विद्यार्थी इतर शाळेतून खरेदी करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
याबाबत न्यूज अँड व्ह्यूज ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण गटशिक्षणाधिकारी प्रणिता गंगाखेडकर यांच्यासहित शिक्षण विभागाच्या पथकाने शाळेची तपासणी केली असता 2026 27 या वर्षात तब्बल 295 विद्यार्थी खरेदी विक्री झाल्याच्या समोर आले तसेच तीन विद्यार्थी हे उत्तराखंड येथील असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेवरून संस्थेने मुख्याध्यापक सारंग जोशी यांना 12 ऑक्टोबर रोजी सेवेतून निलंबित केले मात्र त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी जोशी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार याची कल्पना असल्याने मुख्याध्यापक सारंग जोशी हे सोमवारपासूनच फरार झाले आहेत आता पोलीस या प्रकरणात त्यांना अटक करणार ही हे प्रकरण मॅनेजमेंट साठी जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
चंपावती प्राथमिक शाळेतील आठ ते दहा शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी मुख्याध्यापक जोशी यांनी जो कुटाणा केला तो एकट्याच्या जीवावर करण्याची त्यांची हिंमत नाही त्यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सभापती यांच्यासहित अन्य संचालकांनी देखील प्रवृत्त केले असल्याची चर्चा आहे त्यामुळे केवळ मुख्याध्यापकाचा बळी देऊन हे प्रकरण शिक्षण विभाग मिटवणार की संस्थेवर देखील कारवाई करून संचालकांना दणका देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply Cancel reply