News & View

ताज्या घडामोडी

file 00000000a0688211843e0fd458c61741

मुख्याध्यापक, शिक्षकाने उचलले इन्कम टॅक्स चे लाखो रुपये!

बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थेचा आणखी एक कारभार उजेडात आला आहे. या संस्थेच्या बीड मधील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स चे तब्बल पंधरा लाख रुपये उचलून घेतले. मात्र संस्थेने ही बाब उजेडात आल्यानंतर बदली आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्या पलीकडे कोणतीच कारवाई केली नाही. या दोघांवर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना त्यांना संस्थेने पाठीशी घातले आहे.

राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी  आणि शिक्षक घोटाळा प्रकरणात बीडची जी संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे आणि भारतीय शिक्षणाचा प्रसार करायचा या गोंडस नावाखाली ज्या संस्थेने मराठवाड्यात शाळांचे जाळे उभा केले आहे त्या शाळातील अनेक कुटाने आता समोर येऊ लागले आहेत.

भारतीय शिक्षणाचा प्रसार करायचा या नावाखाली या संस्थेची बीडमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय कार्यरत आहेत यातील प्राथमिक शाळेच्या एका मुख्याध्यापक असलेल्या मॅडमने सहकारी शिक्षकाच्या सहकार्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगारातून कापून घेतले जाणारे इन्कम टॅक्स चे तब्बल 15 लाख रुपये न भरता उचलून घेतले 

देशमुख नावाच्या मुख्याध्यापिका आणि जोशी नावाचा शिक्षक या दोघांनी हा कुटाणा केला मात्र त्यांना माध्यमिक च्या मुख्याध्यापकांचा देखील पाठिंबा होता की काय अशी चर्चा सुरू झाली आणि हे प्रकरण उजेडात आले.

या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर संबंधित मुख्याध्यापिका देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले तर जोशी नावाच्या शिक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली मात्र या दोघांनी इन्कम टॅक्स मध्ये जो अपहार केला आहे त्याबाबत संस्थेने गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली नाही.

प्राप्त माहितीनुसार या दोघांकडून संस्थेने इन्कम टॅक्सची रक्कम वसूल केली आहे परंतु गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या संस्थेकडून जाणीवपूर्वक केला जात आहे.

नागपूर अमरावती जळगाव नाशिक या जिल्ह्यात उघडकीस आलेल्या आणि महाराष्ट्रात व्याप्ती असलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मराठवाड्यात शैक्षणिक जाळे पसरलेल्या या संस्थेमध्ये देखील असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे या संस्थेची शालार्थ आयडी प्रकरणात चौकशी देखील सुरू आहे या संस्थेचे अध्यक्ष कार्यवाह सहकार्यवाह मुख्याध्यापक यांनी हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत सिस्टीम लावली आहे अशातच आता संस्थेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकाने इन्कम टॅक्स चे पैसे चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले मात्र या प्रकरणात संस्थेकडून गुन्हा दाखल करण्याऐवजी त्या दोघांना पाठीशी का घातले जात आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकाने खाल्लेले 15 लाख रुपये संस्था चालकांपर्यंत तर पोहोचले नाहीत ना अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version