News & View

ताज्या घडामोडी

file 00000000ccd071faaf8b4fc1d64fdb7b

मुलगा पडला तरी पैशाचा मोह नाही सोडला!

पुणे –चॅप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी तब्बल वीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नाथा केकाण या पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेची कहाणी मोठी रंजक आहे. लाचेची रक्कम स्वीकारण्यापूर्वी या केकाण महाशयांचा मुलगा पायऱ्यावरून पडला होता, त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणे गरजेचे असताना या केकाण ने अगोदर लाच घेऊ अन मग मुलाकडे जाऊ असे ठरवले अन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जेरबंद केले.

पोलीस दलात रुजू होताना गडचिरोली येथे नियुक्ती मिळाली. तब्बल सहा वर्ष तेथे काढल्यानंतर या नाथा केकाण नावाच्या कर्मचाऱ्याला पीएसआय पदावर पदोन्नती भेटली. तेथून या महाश्यांचा पैशाचा प्रवास सुरु झाला.

पुण्यातील लोणावळा सारख्या पोलीस ठाण्यात पदावर असलेल्या माणसाकडे रावेत सारख्या भागात उच्चभ्रू सोसायटीत टू बी एच के फ्लॅट असणे म्हणजे काही नव नाही. या केकाण यांनी या फ्लॅट सोबतच इतर ठिकाणी देखील इन्व्हेस्टमेंट केल्याची पोलीस दलात चर्चा आहे.

पापाचा घडा एक नाही एक दिवस भरतोच असे म्हणतात ते काही खोटे नाही. नाथा केकाण यांनी पुण्यातील एका प्रकरणात दोन वेळा पन्नाs पन्नास हजार आणि एक वेळा तीस हजार रुपये घेतले. एवढ्यावर हाव नाही थांबल्याने यांनी आणखी पैशाची मागणी केली. शेवटी वैतागून संबंधित व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली अन सापळा रचण्यात आला.

नाथा केकाण यांना लाचेची रक्कम स्वीकारण्यापूर्वी मुलगा पडला असल्याचा आणि त्याला हॉस्पिटल मध्ये न्यावे लागेल असा फोन आला होता. पण या लाचखोराने घराच्या रस्त्यावर असलेल्या एका फूड मॉल शेजारी गाडी थांबवून वीस हजार रुपये लाच स्वीकारली.

एकीकडे मुलगा गंभीर असताना लाच घेण्याचा मोह या केकाण ला थेट जेलमध्ये घेऊन गेला. या व्यक्तीच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version