सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल दशमी
🌸 नक्षत्र…. पु. भाद्रपदा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १९ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १९ नोव्हेंबर २०२६‼️
मेष:- संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. लाभतील चंद्र कामामध्ये प्रगती करण्यासाठी अनुकूल आहे. काही कामामध्ये संयमाने घ्या. नविन जबाबदारी स्वीकारताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ:- दिवसाची सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. उत्तम यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मित्र सहकारी मदत करतील. प्रवास कार्यसाधक होतील. मन प्रसन्न ठेवा. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. नियोजित कार्यातप्रगती साधेल. वरिष्ठाचा सल्ला घ्या. रखडलेली कामे मार्गी करण्यात यश मिळेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. सन्मान प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे.
कर्क:- संयमाने घ्या स्वप्ने साकार होतील. वेळ ‘न’ दवडता कामाला लागा. वक्तृत्व चमकेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मित्र सहकारी यांची साथ लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा. कौटुंबिक जीवन सुखद असेल.
सिंह:- काही काळजीचे कारण नाही. प्रगती साध्य करणारे ग्रहमान आहे. अंतर्मुख व्हाल. जीवनाचा सखोल अर्थ समजेल. दुसऱ्याला शब्द देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. मनावरचा ताण कमी होईल.
कन्या:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. काही नवीन काम सुरू करण्यात यश लाभेल. आर्थिक भरभराट होईल. अनोळखी व्यक्ती पासून व्यावसायिक कार्यात सावध राहा. सामाजिक क्षेत्रात मान- सन्मान मिळेल.
तुळ:- अधिकार वाढतील. भागीदाराशी काही तणावपूर्ण प्रसंग येतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेमुळे प्रगती साध्य होईल. आर्थिक नियोजन योग्य पाऊल उचलले तर यश मिळेल.
वृश्चिक:- संवादाने भेटीतून चांगले यश मिळेल. आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. प्रवास कार्यसाधक होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. उपासना धार्मिक कार्यात सहभागी व्हावे.
धनु:- कौटुंबिक सौख्य लाभेल. रेंगाळलेल्या कामामध्ये संयमाने घ्या कामात प्रगती साधेल. मनातील भीती दूर करण्यासाठी उपासना करावी. मित्र सहकारी यांची साथ लाभेल. दुसऱ्यांची मध्यस्थी टाळा.
मकर:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कामात अनुकूलता वाढेल. शत्रू पराभूत होतील. सामाजिक क्षेत्रात मान- सन्मान वाढेल. परिवारातील सदस्य आपल्या कामात सहभागी होतील. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. शब्दावर नियंत्रण ठेवावे लागेल. विनाकारण वादविवाद होतील. घराच्या जवळपास मतभेदाचे प्रसंग येतील. संयमाने चांगले यश मिळेल. कामातील अडथळा दूर होईल.
मीन:- अनुकूल ग्रहमान आहे. अनावश्यक खरेदी टाळावी. कामे पूर्ण होतील. बौद्धिक लेखनात लाभ होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. हितशत्रूपासून सावध रहावे.





Leave a Reply Cancel reply