News & View

ताज्या घडामोडी

file 0000000089b08211b2d6beed047a8003

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल अष्टमी/ लाला लजपतराय पुण्यतिथी
🌸 नक्षत्र…. धनिष्ठा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १७ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️

‼️दिनांक १७ नोव्हेंबर २०२६‼️

मेष:- सकारात्मक विचार करा. संयमाने घ्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करा लाभ होतील. कौटुंबिक जीवन सुखद असेल.

वृषभ:- केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. कामाचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करा लाभ होतील. नोकरी – व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग येतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन:- दक्षता बाळगा अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष कामात लक्ष केंद्रित करावे. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. चांगला संदेश प्राप्त होईल.

कर्क:- दुसऱ्यांवर विश्वासून राहू नका. भागीदारीच्या व्यवसायात सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. परस्पर सहकार्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सुखद असेल.

सिंह:- आपणाला विचलित करण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरी – व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करा. भेटीगाठी होतील नियोजित कार्यात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या:- अनुकूल दिवस असेल. कामाच्या ठिकाणी काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कामास काम कराल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कला आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळेल.

तूळ:- विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील वातावरणात काही तणावपूर्ण असू शकते. नवीन जबाबदारी वाढेल नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. संवाद साधताना संयम ठेवा. उपासना धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.

वृश्चिक:- पूर्वग्रह सोडून देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्या. आत्मविश्वासात वाढ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन परिचित लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. यश मिळेल.

धनु:- विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही छोट्या गोष्टी मतभेद निर्माण करू शकतात. काळजी घ्या संयमाने व सकारात्मक विचार करून निर्णय घ्या. वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे.

मकर:- काही कामे मनाप्रमाणे झाल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. स्वभावात चिडचिड निर्माण होऊ शकते संयमाने घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. प्रवास कार्यसाधक होतील.

कुंभ:- अनावश्यक खरेदी करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ध्यान प्राणायाम करून मन प्रसन्न राहिल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमेल. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक करा. इतरांचे सहकार्य मिळेल.

मीन:- उत्तम दिवस आहे. नियोजित कार्यातप्रगती व आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सकारात्मक विचार करा कामात सामाजिक क्षेत्रात मान – सन्मान वाढेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आर्थिक नियोजन योग्य होण्यासाठी प्रयत्न करा लाभ होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version