News & View

ताज्या घडामोडी

pudhari import wp content uploads 2022 07 6 5 1

संचमान्यतेसाठी बोगस विद्यार्थी :बोरगाव च्या शाळेचा प्रताप!

बीड -पटसंख्या मॅनेज करण्यासाठी आणि संचमान्यता मिळवून शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी गेवराई तालुक्यातील बोरगाव येथील नूतन विद्यालयाने दहावीच्या वर्गात शाळेबाहेरील 19 विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवल्याची तक्रार शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादेक इनामदार यांनी पुराव्यासहित तक्रार केली असून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासहित संचालक मंडळावर कारवाईची मागणी केली आहे. बीडमधील चंपावती शाळेत याच पद्धतीने बोगस विद्यार्थी खरेदी विक्रीचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर आता हे प्रकरण उघडकीस आले आहे.

गेवराई तालुक्यातील बोरगाव येथील नूतन विद्यालय या शाळेत पटसंख्या मॅनेज करण्यासाठी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन नावंदे,मुख्याध्यापक रमेश वाघलेऱे,क्लार्क वैजेनाथ व्हट्टे,मंगेश मुगळे आणि नागनाथ नावंन्दे यांनी एक दोन नव्हे तरी तब्बल 19 विद्यार्थी इतर शाळेचे दाखवून दहावीच्या वर्गाची पटसंख्या मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.

या विद्यार्थ्यामध्ये प्रांजली गायकवाड,अश्विनी महागुन्डे,कोमल बराडे,वर्षा बराडे,दिक्षा उधारे,दिक्षा शेडगे,निखिल गायकवाड,ओंकार रुपणर,राधिका बोराडे,शिवम लोंढे,सोनाली बहिर,अक्षरा खेडकर,प्रियंका सोनवणे,कार्तिक जाधव,रितेश खंडेलवार,रोहित खंडेलवार,रविंद्र लोंढे,कार्तिक गायकवाड,दत्ता पवार यांचा समावेश आहे.

या शाळेने संचमान्यता मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश दिल्याचे दाखवले. त्यांची बोगस कागदपत्रे जोडून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी चौकशी करून संबंधित संस्था, संचालक आणि दोषीवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी इनामदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version