News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल अष्टमी
🌸 नक्षत्र…. चित्रा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. २१ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक २१ जुलै २०२६‼️

मेष:- कामामधील अडचणी दूर करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. बोलण्यातील स्पष्टता व्यवहार्य राहील याची दक्षता घ्यावी. श्रीगणेश दुर्गा उपासना करावी.

वृषभ:- कामामध्ये प्रगती साधेल मध्यस्ती करणे टाळावे. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. प्रवास कायसाधक होतील. सुसंवाद साधावा. कुलदेवीची उपासना करावी.

मिथुन:- संवादकौशल्यामुळे कामे सहज होतील. ओळखीतून सहकार्य लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. नारायणाची उपासना लाभदायक होईल.

कर्क:- अनुकूल दिवस आहे. जास्त धावपळ न करता कामामध्ये सुसुत्रीपणा येईल त्यामुळे कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. शिव उपासना करावी. मनसामर्थ्यासाठी ध्यानोपासना करावी.

सिंह:- सकारात्मक वातावरण असेल. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन चांगले असेल. श्रीसूर्यनारायणाची उपासना लाभदायक होईल.

कन्या:- महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. योग्य नियोजन व कामाची हातोटी चांगले यश मिळवाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामे होतील. मन प्रसन्न राहील. श्रीविष्णु उपासना लाभदायक होईल.

तुळ:- उत्साही आनंदी दिवसाची सुरुवात होईल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. लोकांचे सहकार्य लाभेल. भेटीगाठीतून समाधान मिळवाल. देवी उपासना करावी.

वृश्चिक:- काही खरेदिचा विचार करत असाल तर आज आमलात येईल. आर्थिक लाभ होतील. स्पष्टपणे बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ घालवाल. श्रीदुर्गा उपासना लाभदायक होईल.

धनु:- सामाजिक कामामध्ये रस घ्याल त्यातून प्रतिष्ठा वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक काम होईल. काही शुभ समाचार समजल्याने उत्साही राहाल.

मकर:- प्रगती साधेल सकारात्मक विचारपूर्वक कार्य संपादन कराल. वरिष्ठांची साथ मिळेल. नियोजित कामातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. कार्यपूर्तीचा आनंद मिळेल. हनुमानाची उपासना लाभदायक ठरेल.

कुंभ:- नविन कामाची संधी प्राप्त होईल. जबाबदारी यशस्वीपणे स्विकाराल. कामामध्ये सहयोग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मनःशांतीसाठी ध्यान प्राणायाम करावा.

मीन:- समाधानकारक घटनांचा दिवस आहे. अचानक खर्च उद्भवू शकतो. उधारी देणे टाळावे. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मित्रांच्या भेटीगाठीतून आनंद मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version