मुंबई -स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून ११ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष नितीन नबीन आणि इतरही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर रविवारी रात्री साडे वाजता भाजपने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवर भाजप सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी (Arun Lakhani) यांना भाजपने तिकीट दिले आहे. भारतीय जनता पक्षात कालच (शनिवारी) प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
अरुण लाखानी हे भाजपचे पदाधिकारी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्र आहे. लखानी यांचे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असल्याने त्यांनाच या ठिकाणहून उतरविण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली-श्री अरुण लखाणी
२. भंडारा-गोंदिया-श्री अविनाश ब्राह्मणकर
३. अमरावती-श्री प्रवीण पोटे पाटील
४. सांगली-सातारा-श्री धैर्यशील कदम
५. सोलापूर-श्री राजेंद्र राऊत
६. अहिल्यानगर-श्री प्राजक्त तनपुरे
7-छत्रपती संभाजीनगर-जालना -श्री सुहास शिरसाट
८. नांदेड-श्री अमर राजूरकर
९. धाराशिव-लातूर-बीड-श्री बसवराज पाटील
१०. जळगाव-श्री नंदकिशोर महाजन
११. नागपूर-उमेदवार: डॉ. राजू पोतदार





Leave a Reply Cancel reply