News & View

ताज्या घडामोडी

QXxomJhh 400x400 250x250 1

आप ला धक्का :राघव चढा सहित तीन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली -आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. खासदार राघव चढा यांच्यासह तीन खासदारांनी पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चढा यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर राज्यसभेत आवाज उठवल्यानंतर आप ने त्यांना राज्यसभेत बोलण्यासाठी बंदी घातली होती. त्यानंतर त्यांच्या या निर्णयामुळे आप ला मोठा धक्का बसला आहे.

राघव चड्ढा यांच्यासोबतच राज्यसभा खासदार अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनीही AAP सोडून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. या तिघांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढा यांनी आपल्या पक्षावरच गंभीर आरोप केले. “माझ्याच पक्षाने माझा आवाज दाबला. मला माझे विचार मांडण्याची संधी दिली नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यसभेतील AAP च्या दोन-तृतीयांश सदस्यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. देशाच्या विकासासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपला पुढील राजकीय प्रवास भाजपसोबत करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे दिल्लीसह राष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version