News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल त्रयोदशी / वैकुंठ चतुर्दशीचा उपवास
🌸 नक्षत्र…. अश्विनी
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २२ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/४० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️

‼️ दिनांक २२ नोव्हेंबर २०२६‼️

मेष:- आनंदी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल कामात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भेटीतून कामामध्ये प्रगती साधेल पराक्रम सिद्ध कराल.

वृषभ:- काही अडथळे आले तरी कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळा. बोलण्यात संयम ठेवावा.

मिथुन:- मना मानसी व्यर्थ चिंता वाहतो. काळजी करु नका. नियोजित कार्यातप्रगती साधेल मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मध्यस्थी टाळा.

कर्क:- आपले नियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांशी व्यवहार करताना संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता दाखवण्याची संधी मिळेल. सन्मान प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक नियोजन योग्य होईल.

सिंह:- प्रगती करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. प्रवासाचे योग संभवतात. प्रवास कार्यसाधक होतील नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.

कन्या:- चांगला दिवस आहे. उत्साहाने काम कराल. अचानक खर्च उद्भवू शकतात. मालमत्तेच्या संदर्भात निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक जीवन सुखद असेल. काही विशेष प्रश्न चर्चेतून सोडवावेत.

तूळ:- काही मतभेद होण्याची शक्यता आहे. संयमाने घ्या, समजूतदारपणा ठेवावा. नियोजित कार्यातप्रगती साधेल जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार करताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक:- जुनी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा. कामाचा व्याप वाढू शकतो. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी प्रयत्न करा वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनु:- चांगला दिवस आहे. कलात्मक कामात यश मिळेल. ध्यान उपासना करावी. आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. भेटीतून चांगले परिणाम मिळू शकतात.

मकर:- साधारण दिवस आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. वातावरणात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. घाई करू नका. नोकरी-व्यवसायात संयमाने काम करणे हिताचे ठरेल. आर्थिक नियोजन योग्य होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कुंभ:- नविन जबाबदारी वाढेल आत्मविश्वासपूर्वक कामात यश मिळेल. मित्र सहकारी यांची साथ लाभेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.

मीन:- नियोजन योग्य पद्धतीने करावे. अनावश्यक खरेदी टाळावी. आपल्या कामात कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नित्य कामात प्रगती साधेल. संयमाने घ्या चांगले परिणाम मिळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version