Category: महाराष्ट्र
-

भाशिप्र पाठोपाठ चंपावती शिक्षण संस्थेच्या चौकशीचे आदेश!
बीड –बोगस शालार्थ आयडी, नोकर भरती आणि इतर गैरप्रकार बाबत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या चौकशी पाठोपाठ बीडमधील नावाजलेल्या चंपावती शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत. किरण देशपांडे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती,…
-

भाशिप्र मधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती!
बीड -भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड व इतर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व कर्मचारी भरती बाबत प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण देशपांडे यांच्या तक्रारी वरून शिक्षण उपसंचालक यांनी ही समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे आता या संस्थेत बोगस…
-

भुमाफियानी करपरा नदी केली गिळंकृत!
बीड – बीडच्या भूमाफियांनी अक्षरशः नदीपात्र गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष बाब म्हणजे नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेत नदीवर करण्यात आलेले अतिक्रमण अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील सुमती नगर भागात करपरा नदीच्या मधोमध भिंत घालून भूमाफियांनी नदी गिळंकृत करत प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे राज्याच्या पर्यावरण…
-

आवक जावक खाडाखोड प्रकरणी चौकशी समिती गठीत!
बीड –बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात आवक जावक रजिस्टर मध्ये झालेल्या खाडाखोड प्रकरणात शिक्षण उपसंचालक यांनी त्रिस्तरीय समितीचे गठण केले आहे. हिंगोलीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण…
-

मुख्याध्यापक, शिक्षकाने उचलले इन्कम टॅक्स चे लाखो रुपये!
बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांना नोकरीवर घेणाऱ्या संस्थेचा आणखी एक कारभार उजेडात आला आहे. या संस्थेच्या बीड मधील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स चे तब्बल पंधरा लाख रुपये उचलून घेतले. मात्र संस्थेने ही बाब उजेडात आल्यानंतर बदली आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्या पलीकडे कोणतीच…
-

महिलेच्या पोटात ग्लोज अन टीश्यू पेपर!जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार!
बीड –बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शल्य चिकित्सक डॉ सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे समोर आले आहे. सिझेरियन केलेल्या एका महिलेच्या पोटात ग्लोव्हज आणि टीश्यू पेपर राहिल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे. आरोग्य खात्याचे कारनामे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोर्या रूग्णांच्या मुळावर उठला आहे. बाळांतपणासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या एका…
-

परभणीचे सीएस आणि डीएचओ सस्पेंड!
परभणी -गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणी परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मोरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजय पांचाळ या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य सेवेतील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.परभणीच्या जिंतूर येथील शेख अमीना शेख आयुब या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला परभणी स्त्री जिल्हा रुग्णालयात…
-

दादा आणि वहिनींच्या कामात फरक!सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आ क्षीरसागर यांची नाराजी!
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कारभारावर थेटपणे नाराजी व्यक्त करत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दादा आणि वहिनीच्या कारभारात जमीन आसमान चा फरक आहे वहिनी आणि पी एस च्या सांगण्यावरून बीडमध्ये कारभार हाकत आहेत त्यामुळे विकासाची कामे जाणीवपूर्वक रोखून धरले जात आहेत असा…
-

मनोज जरांगे यांच्या आरोपावर बीड जिल्हा प्रशासनाचा खळबळ जनक खुलासा!
बीड -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला पत्र दिल्याचा दावा बीड जिल्हा प्रशासनाने खोडून काढला आहे. या प्रकरणात महसूलमंत्री यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार पाच दिवसापूर्वी…
-

हिवताप कार्यालयाकडून शासनाची फसवणूक!डॉ शिंदे सस्पेंड, जीवन सानप मोकाट!
बीड – बीडच्या जिल्हा हिवताप कार्यालयात हिवताप अधिकारी डॉक्टर विजयसिंह शिंदे कर्मचारी जीवन सानप या दोघांनी थकीत वेतन देयकाचे बोगस कागदपत्र सादर करत पाच ते सात कर्मचाऱ्यांच्या नावावर तब्बल 89 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणात हिवताप अधिकारी डॉक्टर शिंदे यांना निलंबित केले आहे मात्र याचा मास्टरमाईंड असणारा जीवन सानप आणि इतर…

