News & View

ताज्या घडामोडी

images 2026 08 26T123952.276

बीडच्या चंपावती शाळेने विकत घेतले तीन विद्यार्थी!नोकऱ्या वाचवण्यासाठी शाळांची धडपड!

बीड – कमी विद्यार्थी संख्येमुळे आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत यासाठी बीडच्या नावाजलेल्या चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी जे मूळ रहिवासी उत्तराखंड मधील आहेत ते विकत घेतल्या चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चंपावती शाळेने 7 ऑक्टोबर रोजी हे विद्यार्थी परत ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून दिले आणि संभाजीनगरच्या एका दलालाने ते परत दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यानंतर शिक्षण विभागाने बीडच्या चंपावती शाळेची चौकशी सुरू केली आहे.

बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पदभरती असेल किंवा बेकायदेशीरपणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रकार असेल यामुळे अगोदरच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या बीडच्या नावाजलेल्या चंपावती शिक्षण संस्थेत मोठा गंभीर गैरप्रकार समोर आला आहे.

पन्नास वर्षापेक्षा अधिक काळाची शैक्षणिक परंपरा असलेल्या चंपावती प्राथमिक शाळेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत विद्यार्थ्यांची पटसंख्या ऑनलाईन नोंदवण्याचे आदेश शिक्षण विभागाने राज्यातील सर्वच शाळांना दिले होते ज्या शाळेत 30 पेक्षा कमी विद्यार्थी एका वर्गात असतील त्या वर्गावरील शिक्षक अतिरिक्त ठरणार होता आणि त्याची बदली इतर संस्थेत किंवा सेवा समाप्ती सारखी कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

पटसंख्या नोंदणी पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर ही डेडलाईन असल्यामुळे चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी उत्तराखंड येथून 28 सप्टेंबर रोजी विकत घेतले त्यामध्ये प्रिन्स रामचंद्र विश्वकर्मा, अर्णव रामभवन वर्मा आणि आर्यन चंद्रशेखर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत असल्याचे दाखवून चंपावती शाळेने तसा अहवाल ऑनलाईन सादर केला आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकाला वाचवले.

मात्र चंपावती शाळेने एवढ्यावरच न थांबता 7 ऑक्टोबर 2026 रोजी हे विद्यार्थी परत ऑनलाईन प्रणाली मधून ड्रॉप बॉक्स मध्ये वर्ग केले परंतु चंपावती शाळेची ही चोरी दुसऱ्या दिवशीच उघड केस आली कारण हेच विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका दलालाने अवघ्या सात हजार रुपयात दुसऱ्याच एका व्यक्तीला विक्री केले.

याबाबत वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण संचालक तसेच छत्रपती संभाजी नगरचे शिक्षण उपसंचालक यांनी बीडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण यांना चौकशीचे आदेश दिले.

बीडच्या शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण यांच्यासहित गटशिक्षणाधिकारी श्रीमते गंगाखेडकर तसेच तीन केंद्रप्रमुख यांनी शुक्रवारी चंपावती शाळेत जाऊन मुख्याध्यापक आणि इतरांची चांगलीच खरडपट्टी काढली 24 तासाच्या आत विद्यार्थी खरेदी-विक्री प्रकरणात अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आले आहेत.

बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे प्रकरण असेल अथवा न्यायालयाची दिशाभूल करून अनेक शिक्षकांची भरती केल्याचे प्रकरण असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी ज्यामध्ये क्लार्क प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई यांना बेकायदेशीर रित्या पदोन्नती देण्याचे प्रकरण असेल यामुळे अगोदरच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या चंपावती शाळेत विद्यार्थ्यांचे खरेदी विक्रीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे शिक्षण विभागाला मॅनेज करण्याच्या नादात चंपावती सहित बीड जिल्ह्यातील अनेक शाळांनी बोगस शिक्षक भरती बोगस शालार्थ आयडी आणि बोगस पदोन्नती असे प्रकार केलेले असताना आता हा विद्यार्थी खरेदी-विक्रीचा प्रकार उघडकीस आल्याने कायम मॅनेज होणारा विभाग म्हणून बदनाम झालेला शिक्षण विभाग चंपावती शाळेवर कोणती कारवाई करतो ते पुन्हा एकदा मॅनेज होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *