News & View

ताज्या घडामोडी

images 2024 04 05T123053.988

वाल्मिक कराड जेलमधून माझ्या मुलाला अडकवण्यासाठी सक्रिय -खा सोनवणे!

बीड: तुरूंगातील बंदी वाल्मीक कराड याने सुग्रीव कराड याला फोन करत विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणेला अडकवण्यासाठी वाटेल ते करा, तुम्हाला शप्पथ आहे, पाण्याच्या टाकीवर चढा, मढे पोलीस ठाण्यासमोर ठेवा, अशा सूचना दिल्याचा आरोप खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय ती कॉल रेकॉर्डिंगही वाजवल्यिाने एकच खळबळ उडाली.

केज येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन दि.१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना खा.सोनवणे म्हणाले, केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सौरभ सोनवणे यास अडकवण्यिाचा प्रयत्न झाला. संतोष देशमूख हत्या प्रकरणात तुरूंगात असलेला आरोपी वाल्मीक कराडने सुग्रीव कराडला फोन केला. घुले हत्या प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचं सोनवणे म्हणाले. मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यापासून ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आणि वारंवार रास्ता रोको करण्याच्या सूचना वाल्मीक कराडने दल्यिाचा दावा त्यांनी केला. जेलमधून सूत्र हलवण्याच्या या आरोपांची चौकशी करून वाल्मीक कराड, सुग्रीव कराड याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. याच बरोबर मला बदनाम करण्याचा कट रचला जातोय. विलास घुले घटनाक्रम कसा जुळवला गेला याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. असंही सोनवणे म्हणाले.


मग पुरवणी जबाबात नाव कसे?
घुले प्रकरणाचं मूळ काय हे बघितलं पाहिजे. हे प्रकरण अनैतिक संबंधाचं आहे. उमेशने ज्या महिलेवर अत्याचार केला त्यामुळे हे प्रकरण झालं. दरम्यान, या प्रकरणात पहिला एफआयआर दाखल झाला तेव्हा माझ्या मुलाचे नाव नव्हते, या प्रकरणात त्याचा संबधही नाही, असे स्वत: एसपींनी सांगीतले मग पुन्हा पुरवणी जबाबात नाव आले कसे?, असा सवाल खा.सानवणे यांनी उपस्थित केला.

कराड अनेक फोनवर बोलतो..
बीड जल्हिा कारागृहात वाल्मिकला पाहिजे त्या सुविधा पुरवल्यिा जातात. त्याला बाहेर बोलण्यासाठी आतील २० बंदीचे फोनकार्ड वापरले जात आहेत. गेल्या दोन दिवसापुर्वी जेल प्रशासनाने केलेली कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी आहे. जेलमधील डॉ.पारखे बदलला पाहिजे, ही माझी मागणी आहे. कराड वापरत असलेले सिम गुन्हेगाराच्या नावावर आहेत. ९ नंबर बरॅकमध्ये मोजकेच बंदी कसे?, जेल कर्मचाऱ्यांकडे आयफोन कुठून आले, याची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे या प्रकरणातील व्हिडिओ सहित अनेक पुरावे आहेत, असं म्हणत सोनवणेंनी कारवाईची मागणी केली आहे.

५०० कोटींचा दावा देणार

घुले हत्या प्रकरणात माऊली शिरसाट, केशव तांदळे, मोहन आघाव, ॲड.राहूल आघाव, सतिष बडे, सुमंत धस, संजय केदार, भगवंत वायबसे, भगवान केदार, धनराज गुट्टे, नवनाथ वाघमारे यांनी आमचा या प्रकरणात संबंध नसताना मला आणि मुलाला बदनाम केले. यात काही लोक हे माझ्या मत्रिाचे मुले असल्याने त्याना माफ करून बाकीच्यांवर ५०० कोटी रूपयाचा मानहानीचा दावा देणार असल्याचे खा.सोनवणे म्हणाले.

गुन्हा नोंद करावाच लागेल

संतोष देशमूख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड तुरूंगातून यंत्रणा हलवित आहे. त्याने घुले हत्या प्रकरणी सौरभ सोनवणेंना अडकवण्यिाचे सांगितले. दरम्यान, तुरूंगात अनेक प्रकार घडत असून त्याला व्हिआयपी ट्रिटमेंट कशी मिळते, तो अनेक लोकांना फोनवर कसे बोलतो, याची चौकशी करून वाल्मिक आणि तुरूंग प्रशासनावर एसपींना गुन्हा दाखल करावाच लागेल, असेही खा.सोनवणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *