News & View

ताज्या घडामोडी

images 63

फडणवीस यांना राज्य अस्थिर करायचे आहे -जरांगे पाटील!

अंतरवली सराटी -आरक्षणाच्या मागणीसाठी दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांना राज्य अस्थिर करायच आहे, आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकायचं आहे, मात्र मराठ्यांनी हिंसक नं होता मुंबई ला जायचं आहे असे आवाहन जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

सरकार जाणून बुजून हलगर्जीपणा करत आहे,मराठा संपवण्यासाठी जाणून बुजून हलगर्जीपणा,29 ऑगस्टला मला उपोषणाची वेळ येऊ देऊ नका म्हणून सांगितले होत,मार्च एप्रिलला प्रसाद लाड म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस आरक्षणावर 100 टक्के मार्ग काढणार आहे पण तसं झालं नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

आम्ही मुंबईकडे निघालो की आमच्यावर हल्ला करायचा हा सरकारचा प्लान-जरांगे यांचा आरोपमराठ्यांना काही मिळत नाही ही फडणवीस, शिंदे यांची मिलीभगत आहे ही खात्रीलायक माहिती आहे

मराठ्यांवर हल्ला करायला तुमच्या बापाची पेंड आहे का.?

मुंबईला जाताना हल्ला झाला तर आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे म्हणून समजा12 सप्टेंबरला सगळ्या मराठ्यांनी अंतरवालीत बैठकीसाठी या,सगळ्या मराठ्यांनी येणं गरजेचं आहेसांगली ,सोलापूर,पुणे,कोल्हापूर, सातारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबईतील मराठ्यांनी जिल्ह्यातील 12 सप्टेंबरच्या बैठकिला अंतरवालीत यावं असे पाटील म्हणाले.

नगर,नाशिक,जळगाव,नागपूर,धुळे, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठ्यांनी या बैठकीला यावे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गावा-गावातील मराठ्यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत यावं.

12 सप्टेंबर रोजी मुंबई आंदोलनाचा निर्णय होणार

बैठकीत जी तारीख मुंबई आंदोलनाची ठरेल त्या तारखेला सर्वांनी मुंबईत यायचं.मुंबई आंदोलना दरम्यान एकाही मराठ्याच्या डोक्याचं रक्त पडलं तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे,जाम झाला पाहिजे.पोलिसांनी मुंबई आंदोलना दरम्यान मराठ्याना कितीही त्रास दिला तरी मराठ्यांनी त्यांना त्रास देऊ नये.मराठ्यांनी सायलेंट आंदोलन करावे,जर पोलिसांनी फडणवीस यांचं ऐकून काही केलं तर पोरांनी पळू नये.चेंगराचेंगरी होईल,।दबा धरा

सरकारनेच कायदा हातात घेतला तर आम्हाला नाईलाज असेल

त्यांनी शांततेत मुंबईत येऊ दिले तर आम्ही शांततेत मुंबईत जाऊ,दिवसाच काय रात्रीही आंदोलन करा,रात्रीही शांततेत आंदोलन करता येतात.पोलिसांनी मराठ्यांना काही केलं तर हा फडणवीस शिंदे यांचा दोष असेल.महाराष्ट्रातील जनता यांचा माज का उतरवत नाही,12 तारखेला यांचा माज उत्तरवणारफडणवीस राजकारण्यांमागे ED लावत आहे,कारखानदार मागे ED लावत आहे.हा मग्रूर शासक राज्याला परवडणार नाही.

अजित दादांचं काय झालं कुणालाही माहीत नाही,कधी रिपोर्ट येणार आहे.शरद पवारांनी मराठ्यांसाठी काय केलं असं विचारतात तुम्ही काय केलं तुम्ही दिलं पण उडवलं त्यांनी दिलं नाही.त्यांनी आमचं वाटोळंच केलं. पण तुम्ही मराठ्यांना भाकर देऊनही औषध टाकून दिली.मराठ्यांनो तुमचे डोके सडले का,माझा जीव मि कुणासाठी जाळतोय.? सावध व्हा महायुती महाविकास आघाडी तुमच्या पोरांना भाकरी खाऊ घालणार नाही.

जाणून बुजून मराठ्यांच्या लेकरांचा अवमान होत असेल तर राजकारणाच्या आहाराला जाऊ नका

सरकारला मराठयांच वाटोळे करायचे असेल तर मराठ्यांना सुद्धा जिद्द पाहिजेअत्याचारी राज्यकर्त्यांची खोडच मोडणार, जरांगे यांनी दिलं रामायण महाभारताच उदाहरणमराठयांनो तुमचे डोके सुपीक करा,जरांगेंचं मराठयांना आवाहन.मराठ्यांनी शत्रच्या मानगुटीवर तलवारी फिरवल्या तेव्हा समाज सुखी झाला-जरांगे

माझा नेता माझा नेता मराठ्यांनी करू नये,फडणवीस यांनी राज ठाकरेंकडून निवडणूकीत भाषण करून घेतलं आणि त्याचंच पोरग पाडलं,फडणवीस सांगेल तस शिंदे करतो.,जरांगे यांनी केली शिंदे ची चष्मा वर करण्याची नक्कल,22 तिकिटे अशी आहेत फडणवीस यांनी सांगितलं आणि शिंदेंनी तिकीट दिली,पक्ष शिंदेंचा. भाजपकडून तिकीट देण्याऐवजी शिंदेंना तिकीट द्यायला लावले.

उध्दव ठाकरेंना यांनीच संपवलं,तसं मराठ्यांना संपवलं जात आहे

एकनाथ शिंदे म्हणायचं आता मला लाज वाटते.पण शिरसाठयाच सांगून यांना मराठ्यांचा तळतळाट घेतला.सर्व नेते आणि जनतेने उठुन उठाव करामला फडणवीस म्हणाले होते,हैद्राबाद गॅझेट निघाल्यानंतर मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. मग आमचे प्रमाणपत्र रद्द का केले गॅझेट का लागू केले नाही याचं तू मला उत्तर दे

2-4 जणांनी ओबीसींच्या इज्जतीचा कचरा केला

या नेत्यांनी इकडे बसू नये.घरीच तुकडे मोडत बसावे.हैद्राबाद गॅझेट जीआर निघाल्यानंतर मला फडणवीस यांचा फोन आला होता.मराठवाड्यातील जास्तीत जास्त समाज आरक्षणात जातो असं ते म्हणाले होते.त्यामुळे मि त्यांच्यावर विश्वास ठेवला.7-8 मिनिटं मि फडणवीस यांना बोललो.आरक्षण जर मराठा समाजाला मिळत असेल तर मला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही असं मि त्यांना म्हणालो होतो।पण मि आरक्षण घेईन असंही मि त्यांना म्हणालो होतो-जरांगे

फडणवीस गोड बोलून पायाखाली घालतो.मुंडे,खडसे, निलंगेकर, तावडे,राणे, अशोक चव्हाण,गडकरी यांचं घर त्याने पायाखाली घातलं.आमचे राजघराणे पायाखाली,कित्येक घराणे याने संपवलेहैद्राबाद गॅझेटीयरमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्यांना आरक्षण देतो असं फडणवीस म्हणाले होते.फडणवीस असं म्हणाले होते हे त्यांना माहीत असेल तर त्यांनी 12 सप्टेंबर प्रयत्न आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावेसे अन्यथा मि मुंबईत आलोच म्हणून समजा

धनगरांचं ऐकून मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मतदान केलं दिलं का आरक्षण.?

ज्यांना केसेस होण्याची भीती वाटते त्यांनी मुंबई आंदोलनात आमच्यासोबत येऊ नये-जरांगेलाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली म्हणून फडणवीस त्यांना पैसे देत नाही,फडणवीस यांना लखपती दीदी बनवायच्या आहेतलाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली म्हणून फडणवीस त्यांना पैसे देत नाही,फडणवीस यांना लखपती दीदी बनवायच्या आहेतमुंबईत जाताना शांततेने जायचं.एरवीही आता पिकं कामातून गेली आहेत. त्यामुळे पोटात तुटायला लागलं आहे.पण एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या करायची नाहीमुंबईत जाताना शांततेने जायचं.एरवीही आता पिकं कामातून गेली आहेत. त्यामुळे पोटात तुटायला लागलं आहे.पण एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या करायची नाही.
.
मुंबईला जाताना जाळपोळ करायची नाही शांततेत जायचं!

कुणीही मुंबईल जाताना जाळपोळ दगडफेक कुणी करू नयेआम्हाला जेलमध्ये टाकलं तर खूप मजा येईल,माझ्यासह सर्वजण आपण जेलमध्ये मजा करू.ज्या गोष्टींना सामोरे जायची वेळ येईल त्याला सामोरे जाऊमि फक्त आरक्षण मागत नाही, समाजाचं संकट अंगावर घेऊन दुष्मण्या अंगावर घेतो,तुम्ही 6 कोटी मराठे मला आधार द्या मि तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला खंबीर आधार देईन,मराठ्यांना मि प्रत्येक संकटाचा सामना करू लागतो.

आमच्या समाजात कुणीही सुखी नाही,मला मराठे सुखी करायचेत म्हणून आपण एकत्र आलो

3 वर्षात सरकारने काहीच केलं नाही यांना आता 5 दिवसात काय होणार आहे? हे आपली मजा बघत आहे आता मुंबईत जाऊन आपन यांचा माज उतरवायचाआमचा मोर्चा आझाद मैदानावर जाणार नाही.वर्षावरच जाणार आम्हाला कोण रोखतो ते मला बघायचं आहे

राज्यात मायक्रो ओबीसी सुखी नाही,मारवाडी सुखी नाही.फडणवीस यांनी आता स्मार्ट मीटर आणलं आहे.याच बिल आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त येतज्यांना मुंबईला यायचं त्यांनी मुंबईला या ज्यांना यायचं नाही त्यांनी शिवार सांभाळा.

फडणवीस यांनी मराठ्यांच्या सगळ्यांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रात दंगली होतील असं काही करू नये अस्थिर होईल असं काही करू नये.एखादया वेळी लोकांचे डोके बिघडले तर लोक दिल्लीकडे सुद्धा जाण्याची शक्यता आहे.एखादी लाट उसळली तर हे कुठेही जाऊ शकते

यंदा 25 ते 22 पट मुंबईतील आंदोलन मोठे होणार.तीन कोटींपेक्षा अधिक मराठे आंदोलनात येणार.मुंबईला जाण्यासाठी आजपासून कामाला लागावे,कुणबी आणि मराठा बांधवांनी 12 सप्टेंबर रोजीच्या बैठकिला यावे.आपण आरक्षण कसं घ्यायचे ते घेऊ.

फडणवीस जाणुन बुजून मराठ्यांना खुन्नस देत आहे.सगळ्यांनी आता सज्ज व्हावे.आंदोलन शांततेत होणार.

ग्रामपंचायतवर नोंदी लावा

ही त्यांची सगळ्यांची मिलीभगत आहे.मराठयांच आंदोलन कसे कोलमडेल हे त्यांना पहायचे आहे.म्हणून मराठ्यांना मि सावध केले आता आपली ताकद किती सरकारची ताकद हे बघायचे आहे.तो काहीही करू शकत नाही.विखेना काय रोग आला काय.? हैद्राबाद गॅझेटीयर नुसार आम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे. ते हे करत नाही.

कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या त्याचे जीआर द्याआंदोलनात सुरुवात फडणवीस करतील आमच्याकडून सुरुवात होणार नाही.राज्य अस्थिर करण्याचा फडणवीस यांचा डाव आहे असा आरोप पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *