छत्रपती संभाजीनगर – केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र बिहार कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर 27 ऑक्टोबरला निकाल लागेल. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासमोर यावेळी महाविकास आघाडी कडून कोण आव्हान उभे करणार अशी चर्चा असून सतीश चव्हाण यांना महायुतीतील नाराजीचा देखील फटका बसू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे यामध्ये छत्रपती संभाजी नगर, पुणे नागपूर पदवीधर मतदार संघासाठी तसेच अमरावती यांनी पुणे शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे.
29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असून 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत.
संभाजीनगर पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यासमोर महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष असून महायुती मधील भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष या जागेवर गावा करू शकतात आणि तसे झाल्यास चव्हाण यांचा मार्ग खडतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




Leave a Reply