Category: महत्त्वाच्या
-

माझं ठरलंय,तुम्ही साथ देणार का -पंकजा मुंडेंचा सवाल !
बीड- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.माझं ठरलं आहे,2024 मध्ये विजयी कौल घेण्यासाठी मी भूमिका घेतली आहे,पक्ष काय डिक्लेयर करायचं ते करेल अस म्हणत त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते…
-

दप्तर दिरंगाई मुळे नोकर भरती रखडली !
बीड- एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 75 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची घोषणा करत असताना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे नोकर भरतीबाबत सुधारित आकृतिबंध तयार नसल्याने भरती रखडल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये दप्तर दिरंगाई केल्याने त्याचा फटका नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या बेरोजगार तरुणांना सहन करावा लागत आहे. राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार…
-

रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्यात घातली- मुख्यमंत्री शिंदे !
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. या रिक्षाने तुमच्या मर्सिडीज ला खड्यात घातलं,मी दोन दिवस गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले म्हणून चर्चा केली,तुम्ही तर असूच वर्षात दोनदाच मंत्रालयात आलात,आमच्या वर आरोप करण्या अगोदर तुम्ही काय वागलात हे बघा.येणाऱ्या काळात खोके कोणाला भेटत होते हे सगळं बाहेर…
-

मंत्री बँकेने नाट्यगृह केले सील !कर्जाचा छदाम ही न भरल्याने कारवाई !!
बीड– तब्बल दहा वर्षांपासून बांधकामासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याने अखेर बीडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई द्वारकादास मंत्री बँकेने केली.नगर पालिकेने या नाट्यगृहाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न मिळवले मात्र बँकेला दमडी न भरल्याने अखेर या कारवाईला सामोरे जावे लागले. येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने बीड नगर परिषदेच्या नाट्यगृहाचे बांधकामाकरिता कर्ज दिले…
-

वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !
बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…
-

शेतकऱ्यांना आता जागेवर काटा पेमेंट ! बीड बाजार समितीमध्ये आ क्षीरसागर यांचा निर्णय !!
बीड -बाजार समितीची सत्ता हातात आल्यानंतर आ संदिप क्षीरसागर यांनी प्रथमच बीट च्या वेळी हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पुढे बीड बाजार समितीमध्ये दिवसातून दोनवेळा बीट होईल आणि शेतकऱ्यांना काटा पेमेंट मिळेल अशी माहिती आ क्षीरसागर यांनी दिली. शेतकरी परिवर्तन आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तनाची सुरुवात केली असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या…
-

रेशनवर मिळणार ज्वारी अन बाजरी !
बीड- राज्यातील सात कोटी जनतेला गहू आणि तांदळासोबत आता ज्वारी आणि बाजरी देखील रेशन मार्फत वितरित केली जाणार आहे.तृणधान्याचे आहारात जास्तीतजास्त समायोजन व्हावे याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील सात कोटी दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिले जातात. याऐवजी किंवा याबरोबरच ज्वारी आणि बाजरी शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे. काही…
-

सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!
नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे. ब्रिटिशांच्या…
-

खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील…
-

वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!
बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…


