News & View

ताज्या घडामोडी

रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्यात घातली- मुख्यमंत्री शिंदे !

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. या रिक्षाने तुमच्या मर्सिडीज ला खड्यात घातलं,मी दोन दिवस गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले म्हणून चर्चा केली,तुम्ही तर असूच वर्षात दोनदाच मंत्रालयात आलात,आमच्या वर आरोप करण्या अगोदर तुम्ही काय वागलात हे बघा.येणाऱ्या काळात खोके कोणाला भेटत होते हे सगळं बाहेर काढू असा इशारा शिंदे यांनी दिला.

शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आज दणक्यात साजरा झाला. शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गोरेगाव इथं नेस्को सेंटरमध्ये विराट असा सोहळा पार पडला. यावेळी शिंदेंनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ‘हा वर्धापन दिन आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा आहे.

एकनाथ शिंदे शाखाप्रमुख मुख्यमंत्री झाला, याच्यामागे मेहनत, कष्ट रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशिर्वाद सोबत होते, त्यामुळे हे झालं. वयाच्या 21 व्या वर्षी कर्नाटकमध्ये 40 दिवस जेलमध्ये होतो. माझ्यासोबत असलेल्या लोकांनीही तेच भोगलंय, त्यामुळे शिवसेना मोठी झाली. घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्यांना हिणवणं योग्य नाही, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

‘वाघाचं कातडं पांघरून लांडगे निघाले म्हणतात, तुमची कोल्हेकुई कधीपर्यंत सुरू असते, जोपर्यंत वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत. वाघ जंगलात आला की दुम दबाके कुठे जातात. 20 जूनला जे केलं ते करायलाही वाघाचं काळीज लागतं. माझ्यात काही बदल झालेला नाही.

काल कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता राहीन, असंही शिंदे म्हणाले. ‘काल त्यांच्या पोटातलं ओठात आलं. तुम्हीच केलीत गद्दारी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तोडले. आमच्यावर आरोप करताय, पण तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही.

मतदारांशी द्रोह केला त्यांना सहानुभूती मिळणार नाही. त्यांच्याकडे असेल तोपर्यंत चांगले, जो गेला तो कचरा. एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही शिंदेंनी ठाकरेंवर केली. ‘शिवसेना धनुष्यबाण गहाण टाकला होता, तो सोडवण्याचं काम आम्ही केलं.

मुख्यमंत्री कोण होते आणि सरकार कोण चालवत होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा, सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी चालवत होतं. निवडणूक आयोगाने आपल्याला धनुष्यबाण आणि शिवसेना दिलं आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

सरकार पडणार पडणार बोलत होते, काल बोलले नाहीत. पडणार नाही त्यांना माहिती झालं आहे. किती खोटारडेपणा करायचा. तुमच्या खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही’ असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

मी दोन दिवस गावाला गेलो तर लगेच मुख्यमंत्री गावाला गेले. तुम्ही अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेले. घरी बसून सरकार चालवता येत नाही, त्यांना राज्यात काय चाललंय हे कळत नव्हतं. हे शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलं.

तुम्ही आयुष्यभर जे पेरलं तेच उगवतंय. बाळासाहेबांनी पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली नव्हती. तुम्ही आम्हाला घरगडी समजता? नोकर समजता?असा सवालही शिंदेंनी केला. ‘तुम्ही जिल्ह्यामध्ये प्रतिस्पर्धी उभा करत होतात, हे पक्षप्रमुखाचं काम नसतं. भांडण लावायची, मजा बघायची याचे अनुभव आम्हाला आहेत. मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून तुम्ही कारस्थानं अपमान करून त्यांना घरी जायला लावायचा पाप तुम्ही केलं.असा कोणताही पक्षप्रमुख नसतो, अशी टीकाही शिंदेंनी केली.

‘ठाकरेंना असुरक्षितता वाटत होतं, त्यांना मास लिडर नको होता, त्यांना दरबारी राजकारण पाहिजे होतं. चांगलं भाषण करायला लागला की त्याचं भाषण कट. एवढे लोक जातायत त्याचं आत्मपरिक्षण करा, का एवढी इनसिक्युरीटी. 50 खोके 50 खोके, लाखो लोकं आले, एवढे खोके कुठून येतील? त्यांना खोके माहिती आहेत, एक दिवस जनतेसमोर खोके आल्याशिवाय राहणार नाही. सगळं बाहेर येईल, असा इशाराही शिंदेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *