News & View

ताज्या घडामोडी

नवलेंनी घेतली हाती तुतारी !

बीड- शिवसेनेचे जेष्ठनेते माजीमंत्री प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बीड लोकसभा निवडणुकीत हाती तुतारी घेण्याचा निर्णय जाहीर केला.कार्यकर्ता बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडताना भाजपच्या एकंदर कार्यपध्दती वर टीकास्त्र सोडले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती कडून शिवसेनेची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत माजीमंत्री प्रा सुरेश नवले यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर बीड येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली.व्यासपीठावर माजी आ सिराज देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रा नवले यांनी 22 जून 2022 ला झालेल्या बंडापासून ते आजपर्यंत चा इतिहास सांगितला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल,मात्र त्यांच्यासोबत आलेल्या अनेक विद्यमान खासदार यांची तिकिटं कापली.हेमंत पाटील,कृपाल तुमाणे, भावना गवळी यांना तिकीट नाकारले. एकप्रकारे भाजपने शिवसेनेवर दादागिरी केली असल्याचा आरोप नवले यांनी केला.

न्यूज अँड व्युजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा !

गेल्या एक दीड महिन्यापूर्वी आपण श्रेष्ठीन्कडे आपली भूमिका मांडली.मात्र आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले गेले .लोकसभा निवडणुकीत भूमिका घ्या असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता.चार पाच दिवस विचार केल्यानंतर आपण बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले.

यापूर्वीच्या खासदाराने रेल्वेसाठी काहीच केलं नाही.देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *