News & View

ताज्या घडामोडी

माझं ठरलंय,तुम्ही साथ देणार का -पंकजा मुंडेंचा सवाल !

बीड- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.माझं ठरलं आहे,2024 मध्ये विजयी कौल घेण्यासाठी मी भूमिका घेतली आहे,पक्ष काय डिक्लेयर करायचं ते करेल अस म्हणत त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली.

2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते करेल पण माझी मी भूमिका घेतली ती फायनल आहे. पक्षाला त्या भूमिकेची सहमत करून घेणे हे माझं कर्तव्य आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. बीड शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोदींचे यशस्वी 9 वर्ष याची माहिती सांगायला मी मध्य प्रदेशमध्ये नक्षलग्रस्त भागात गेले होते. त्यावेळी मी सुरक्षा नाकारली. कारण त्या ठिकाणीं मुंडे साहेबांची आठवण सांगणारे भेटले.

या जिल्ह्यात आईची माया दाईला येत नसते. 2019 ला यशामध्ये आडवे येणाऱ्याला निवडणुकीत आडवा करु अस पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर यायचं, यावर्षी चारशे कोटींची मागणी केल्यावर पदरात फक्त 192 कोटी मिळाले त्यासंदर्भात देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन एकनाथजी शिंदे साहेब जे गरीबांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटा अशा सूचना देखील केल्या.

वंचित पीडितांची कोणती जात नसते, ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. माझ्या लोकांची कामं झालेली नाही. की माझ्या हृदयात दुखतं.मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधून घेणार नाही, फेटा घालून मिरवणार नाही. काही माध्यमांनी विचारलं ताई तुम्ही आमदार नाही खासदार नाही झालात, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही तरी एवढी चर्चा का. त्यावर सर्व समावेशक चेहरा पंकजा मुंडे झाल्या आहेत. अशी प्रतिक्रिया दिली मी जी भूमिका घेतली ती घेतली.

2024 ला ऐतिहासिक विजय मिळवायचा. पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल. राजकारणाच्या पटलावरून बीड जिल्हा बाजूला गेला नसेल. येणाऱ्या विजयाच्या शपथेमध्ये मला कोण कोण सहकार्य करणार. बीड जिल्ह्याच्या एकतेचा विजय असो असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *