News & View

ताज्या घडामोडी

धनंजय मुंडेंनी मैदान गाजवलं !

बहुरंगी शेतकरीपुत्राकडे शेतीच नाही- मुंडे !

बीड- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या सभेत तडाखेबंद भाषण करत उपस्थितांची दाद मिळवली.समोरचा बहुरंगी उमेदवार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवतो,पण याला शेतीच नाही,सगळी जमीन प्लॉटिंग ची आहे.मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठेही नसणाऱ्या या व्यक्तीने कुणबी प्रमाणपत्र सगळ्यात अगोदर काढून घेतले.जात पात न पाहणाऱ्या बीड जिल्ह्याने यावेळी पंकजा मुंडे यांना लोकसभेत पाठवावे असे आवाहन मुंडे यांनी केले.

बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली.यावेळी आ सुरेश धस आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

धनंजय मुंडे म्हणले की,बीड जिल्ह्याचे पहिले खासदार रामचंद्र परांजपे होते,जे ब्राम्हण होते,स्व मुंडे यांनी रजनीताई पाटील,जयसिंगराव गायकवाड पाटील यांना खासदार केलं,प्रकाश सोळंके, सुरेश धस,अमरसिंह पंडित,लक्ष्मण पवार असे मराठा नेते आमदार केले.

मुंडे घराण्याने कधीच जात पात पाहिली नाही,इथल्या जनतेने देखील कधी जातीवर मतदान केलं नाही.आपल्या समोरचा उमेदवार हा स्वतःला शेतकरिपुत्र म्हणवतो,पण कशाची शेती करतो याचा शोध घेतला तेव्हा याला शेतीच नाही अस कळलं.त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे प्रदेशाध्यक्ष आले पण अर्ज दाखल करायला गेले नाहीत.कारण त्यांनाही माहीत आहे,हा बहुरंगी उमेदवार मागच्या वेळी लहान बहिनीकडून पडला आहे,यावेळी तर मोठीशी लढत आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत झालेला विकास आणि पुढील काळातील नियोजन सांगत तडाखेबंद भाषण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *